28 दिवस पूर्ण झाल्याने कोरोना लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST2021-02-15T05:00:00+5:302021-02-15T05:00:47+5:30

केंद्रीय आरोग्य व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ४२५, प्रंटलाईन वर्कर ४ हजार ४०४, गृह विभागातील २ हजार २३६, महसूल एक हजार ३३६ आणि पीआरआय ११९ आदी कर्मचाºयांचा समावेश होता.

Second dose of corona vaccine after completion of 28 days | 28 दिवस पूर्ण झाल्याने कोरोना लसीचा दुसरा डोस

28 दिवस पूर्ण झाल्याने कोरोना लसीचा दुसरा डोस

ठळक मुद्देआजपासून लसीकरण : पहिल्या टप्प्यात ६७. ५० टक्के पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील कोविडशिल्ड लसीकरणाला सोमवारी २८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करर्सला सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील लस टोचण्यात येणार आहे. यासाठी १८ लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले. जिल्ह्याला अतिरिक्त लसींचे डोसही मिळाले आहेत. शनिवार (दि.१३) पर्यंत जिल्ह्यात ६७. ५० टक्के लसीकरण झाले आहे.
केंद्रीय आरोग्य व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ४२५, प्रंटलाईन वर्कर ४ हजार ४०४, गृह विभागातील २ हजार २३६, महसूल एक हजार ३३६ आणि पीआरआय ११९ आदी कर्मचाºयांचा समावेश होता. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याने लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ् कोविड योद्धांना २८ दिवस पूर्ण झाले. जिल्ह्यातील १८ केंद्रांमध्ये सर्वांना सोमवारपासून कोविडशिल्ड लस टोचण्यात येणार आहे. यासाठी  जिल्हा आरोग्य तसेच मनपाचे आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे.
 

तुकूम केंद्रात पोलिसांचे लसीकरण
चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाचे तीन केंद्र सुरू आहेत. सोमवारपासून तुकूम परिसरातील मातोश्री सभागृहात एक केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रात प्रामुख्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. लस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसºया टप्प्यात यापूर्वीच्याच दोन केंद्रात लस देण्याची व्यवस्था मनपा आरोग्य प्रशासनाने केली आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्वांची प्रकृती ठणठणीत
जिल्ह्यातील १८ केंद्रांमध्ये २३ हजार ४०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. शनिवारपर्यंत १५ हजार ७९६ जणांनी लस घेतली. कोरोना लसीबाबतचे गैरसमज दूर झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता उद्दिष्टपूर्तीकडे सुरू झाली. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्या सर्वांची प्रकृतीही ठणठणीत आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला.

 

Web Title: Second dose of corona vaccine after completion of 28 days