शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला

By admin | Updated: April 20, 2015 01:15 IST

आर.टी. अ‍ॅक्टनुसार शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात शालेय पोषण आहाराचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे.

चंद्रपूर : आर.टी. अ‍ॅक्टनुसार शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात शालेय पोषण आहाराचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे. बचत गटाची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे, असे स्पष्ट मत शिक्षण उपसंचालक महेश पालकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेला पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे. ज्या ठिकाणी बचतगट अस्तित्वात आहे, अशा ठिकाणी बचत गटामार्फत स्वयंपाकी तथा मदतनीसांची नियुक्ती करायची आहे. परंतु सत्र २०१४-१५ मध्ये नियुक्ती संदर्भात शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीकडे गावस्तरावर कोणतीच लेखी तक्रार नसतानासुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाकडे परस्पर तक्रारी करून मुख्याध्यापकांना विनाकारण मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडत आहे. म्हणून या संदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर २१ डिसेंबर २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने रितसर तक्रार केली होती. शासनाने परिषदेच्या तक्रारीच्या अनुषंगाने ३१ जानेवारीला प्राथमिक शिक्षण संचालकांकडे निवेदनाच्या अनुषंगाने माहिती देण्याच्या दृष्टीने पत्र पाठविले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडे ३१ मार्चला कार्यवाहीचे पत्र पाठविले आहे.शालेय पोषण आहार योजनेत मुख्याध्यापकाची जबाबदारी कमी करण्याबाबत २६ फेब्रुवारी २०१४ रोजीचे परिपत्रक निर्गमीत केले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना कळविण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.शालेय पोषण आहार संदर्भात बचतगटाकडे इंधन व मजुरी खर्च वर्ग करण्यात येत असतो, तर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम स्वयंपाकी तथा मदतनीस करतात. त्यासाठी त्यांना स्वतंत्र मानधन दिले जाते. तसेच याबाबत स्वतंत्र अनुदान वितरीत केले जाते. सदर योजनेतून पूर्णत: मुख्याध्यापकांना वगळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली असली तरीही सदर योजना ही विद्यार्थी केंद्रीत असून त्यामध्ये मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)