शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यात रॉकेलची टंचाई

By admin | Updated: November 1, 2014 22:51 IST

घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती आणि अत्यल्प मिळणारे रॉकेल, यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे

देवाडा खुर्द : घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती आणि अत्यल्प मिळणारे रॉकेल, यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नसल्याने परिसरामध्ये इंधनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका कार्डवर पाच लिटर रॉकेल ऐवजी फक्त २०० ते ३०० ग्रॅम रॉकेल मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पोंभूर्णा येथे दोन हजार ६४० च्या वर कार्डधारक आहेत. पूर्वी या कार्डधारकांना पाच लिटर रॉकेल मिळायचे; परंतु सद्यस्थितीत कार्डधारकांना दोन ते तीन लिटर रॉकेल मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हिच स्थिती तालुक्यातील ग्रामीण भागात आहे. याबाबत स्थानिक दुकानदारांना विचारणा केली असता, रॉकेलचा पुरवठा कमी होत असल्याने आम्ही जास्तीचे रॉकेल कुठून देणार, असा प्रतिप्रश्न ते उपस्थित करतात. मात्र ग्राहकांचे कमी रॉकेलमध्ये भागत नसल्याने विक्रेत्याकडून ते जास्त रॉकेलची मागणी करीत असतात. यातून दुकानदार व ग्राहकांमध्ये किरकोळ वाद उद्भवत असतात. अशा प्रकारामुळे ग्राहक आणि दुकानदारही त्रस्त होतात.ग्रामीण परिसरामध्ये घरगुती वापरासाठी इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर रॉकेलचा वापर होतो. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगणाला भिडल्याने नागरिकांना रॉकेलवरच अवलंबून राहावे लागते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज असूनसुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अनेक गावांतील वीज रात्रीच्या वेळी खंडीत होत असते. त्यामुळे गावकरी स्वयंपाक तसेच रात्रीच्या प्रकाशासाठी रॉकेलचा उपयोग करतात. मात्र ग्रामीण भागातील रॉकेलचा पुरवठाच नगण्य झाल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. शासकीय दरानुसार १८ रुपये लिटरप्रमाणे रॉकेलची विक्री केली जात असताना काही दुकानदार अन्य ग्राहकांकडून २५ ते ३० रुपये लिटर घेत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. अनेक खासगी प्रवासी वाहने व ट्रॅक्टरसारख्या वाहनांमध्ये रॉकेलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मग हे रॉकेल वाहन चालक व मालकांना कोठून मिळते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)