शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पोषक आहार पुरविणारे बचत गट बेरोजगार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:48 IST

आयुक्त, एकात्मिक बाल विकास महिला सेवा योजनांतर्गत अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष मुलांना गरम ताजा पोषक आहार ......

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना साकडे : ‘त्या’ जाचक अटी दूर कराव्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयुक्त, एकात्मिक बाल विकास महिला सेवा योजनांतर्गत अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष मुलांना गरम ताजा पोषक आहार पुरविणाºया असंख्य महिला बचत गट बेरोजगारीच्या संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.२००५ वर्षापासून निरंतर अल्पदरात व उत्कृष्ठ शुद्ध व ताजे पोषक आहार अंगणवाडीतील मुलांना पुरविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्यात स्थानिक कार्यक्षम महिला बचत गटाचे माध्यमातून सुरू आहे. या माध्यमातून असंख्य महिला बचत गट सक्षम होवून बेरोजगारीतून मुक्त झाले आहे. सर्व सुरळीत चालू असताना महाराष्ट्र शासनाने राज्य पातळीवर आयुक्त कार्यालय, नवी मुंबई यांनी पूर्वीच्या धोरणात आमुलाग्र बदल करून अत्यंत जाचक अटी व शर्ती लावून नवीन टेंडर काढले आहे. त्यामध्ये कोट्यवधीची मशीन लावण्याची अट, तीन वर्षाची अडीच कोटीची उलाढाल असणे बंधनकारक आहे. स्वत:ची प्रयोगशाळा अंदाजे ३० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. हाताने शिजविलेले अन्न पोषक व दर्जेदार असते, तर मशिनरीचा वापर करून व चार महिन्यांपर्यंत वापरण्यास योग्य अन्न कधीच गुणवत्तेदार असू शकत नाही म्हणून हजारो महिला बचत गट कार्यकर्ता व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणणारा असा तुघलकी निर्णय त्वरित मागे द्यावा, अशी मागणी आहे.या सर्व अटी सर्व साधारण महिला बचत गट पूर्ण करूच शकणार नाही, उलट या योजनेचे केंद्रीकरण होऊन विशिष्ठ व मर्यादित धानढ्य तसेच व्यावसायिक दृष्टीकोण ठेवणाºया गटांना सरळ लाभ होईल, असे झाल्यास असंख्य बचत गट महिला बेरोजगारीच्या खाईत लोटले जाणार आहे. त्यामुळे नवीन अटी व शर्तीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया त्वरित थांबवून पोषक आहार पुरवठ्याचे काम हे स्थानिक कार्यरत बचत गटांना द्यावे, अशी मागणी केली.