शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या आरोपात गेले आदिवासी महिलेचे सरपंचपद

By admin | Updated: March 14, 2015 01:05 IST

चिमूर तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खडसंगी गटग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन अशोक कुंभरे या मागील अडीच वर्षापासून...

खडसंगी: चिमूर तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खडसंगी गटग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन अशोक कुंभरे या मागील अडीच वर्षापासून गावाचा कारभार सांभाळत आहे. मात्र रुपचंद शास्त्रकार यांनी शौचालय नसल्याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरुन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करुन शौचालय असल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना दिला. मात्र या अहवालात हेराफेरी करुन शौचालय नसल्याचा दुसरा अहवाल वरिष्ठाच्या व राजकीय पुढाऱ्यांचा दबावात दिल्याचा आरोप सरपंच सुमन कुंभरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे शासनाच्या या लालफित शाहीमध्ये आदिवासी महिला सरपंचास आपले पद गमवावे लागले.आपण सरपंच बनण्यापूर्वी सन १९९७-९८ मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यावेळी शौचालयाचे बांधकाम केले. निवडणुकीदरम्यान नियमानुसार नामांकन अर्ज दाखल करून शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. सार्वत्रिक निवडणुकीत विजयी होवून सरपंचपदावर विराजमान झाले.मात्र अडीच वर्षानंतर शास्त्रकार यांनी आपल्याकडे शौचालय नसल्याची तक्रार केली. शौचालय असतानाही अधिकाऱ्यांनी शौचालय नसल्याचा चुकीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला. कुठलीही चौकशी न करता किंवा आपली बाजू माडण्यांस वेळ न देता अधिकाऱ्यांनी आपल्याला अपात्र घोषित केल्याचा आरोप करण्यात आला. सरपंच सुमन कुमरे यांच्यावरच शौच्छालय असतानाही कोणत्या कारणाने कारवाई करण्यात आली, हा प्रश्न अद्यापही कायम आहे.आपल्याकडे शौचालय आहे आणि ते वापरात असतानाही खोटा अहवाला वरिष्ठांना देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुमन कुमरे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला उपसरपंच दत्तु देव्हारे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य अरविंद पाटील, माजी सरपंच नम्रता वासनिक, सुभाष सोनुने आदी उपस्थित होते.(वार्ताहर)