शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

संदीप यासलवारने जामीन नाकारला

By admin | Updated: September 11, 2014 23:24 IST

बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला

न्यायालयीन कोठडीत रवानगी : अटकेविरोधात अन्नत्याग ंचंद्रपूर : बाबूपेठ उड्डाण पुलाच्या निर्र्मितीसाठी मोबाईल टॉवरवर चढून वीरूगिरी आंदोलन करणाऱ्या संदीप यासलवार याला अखेर आज गुरूवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले. मात्र प्रशासनाने आपला शब्द न पाळल्याचा आरोप करीत संदीपने जामीन घेण्यास नकार देत न्यायालयीन कोठडीत जाणे पसंत केले. विशेष म्हणजे, या कारवाईविरोधात त्याने न्यायालयीन कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.बाबपेठ येथील उड्डाणपुलाच्या मागणीसाठी १३ आॅगस्टला संदीपने बाबूपेठ परिसरात नेताजी चौकातील नालमवार यांच्या घरी लावलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले होते. तब्बल १० तास तो टॉवरवरच होता. दरम्यानच्या काळात संतप्त नागरिकही रस्त्यावर उतरल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी १२ वाजतापासून तर रात्री १०.३० वाजेयर्पंत त्याचे हे आंदोलन सुरू होते. खाली उतरविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही तो उतरण्यास तयार नव्हता. कुणीही जनप्रतिनिधीने येऊन बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे, तेव्हाच आपण उतरू, अशी भूमिका त्याने घेतली होती. अखेर रात्री १०.३० वाजता तहसिलदार शिंंदे यांनी कसलीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्यावर संदीप खाली उतरला होता. मात्र, ३ सप्टेंबरला शहर पोलिसांनी संदीपविरूद्ध भादंवि ३०९ कलमानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांची ही भूमिका अन्यायकारक असल्याचे त्याने ४ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत सांगितले होते. दरम्यान, आज ११ सप्टेंबरला शहर पोलिसांनी त्याच्या घरून सकाळी १०. ३० वाजता त्याला अटक केली. त्यानंतर दुपारी त्याला न्यालायलात हजर केले असता, न्यायाधिशांनी जमानतदाराबद्दल विचारणा केली. मात्र, आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याने या निषेधार्थ जमानत नाकारत असल्याने सांगून त्याने जमानत घेण्यास नकार दिला. अखेर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना त्याने प्रशासनावर टीका केली. कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने आपल्याविरूद्ध कलमा लावल्या. ही कारवाई चुकीची असल्याने आपण या विरोधात न्यायालयीन कोठडीत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याने संदीपने सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)