शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करीचा ट्रॅक्टर अखेर गावकऱ्यांनीच पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

सावली : सावली तालुक्याला वरदान ठरणारी वैनगंगा नदी. याच नदीच्या पात्रातून रोज ट्रॅक्टर, हायवाद्वारे रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. ...

सावली : सावली तालुक्याला वरदान ठरणारी वैनगंगा नदी. याच नदीच्या पात्रातून रोज ट्रॅक्टर, हायवाद्वारे रेतीची चोरटी वाहतूक केली जाते. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर तालुक्यातील निलसनी पेडगाव येथील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन पहाटेपासून ट्रॅक्टरद्वारे चालणारी चोरट्या रेतीची वाहतूक अडवून ट्रॅक्टर पकडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

रोज धावणाऱ्या चोरट्या रेतीच्या वाहतुकीने गावकरी त्रस्त झाले होते. त्यामुळे गावातून रोज पहाटे सुरू होणारी अवैध रेतीची वाहतूक थांबविण्यात यावी, अशी मागणी अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली होती. तालुक्यातील निलसनी पेडगावची सीमा ही वैनगंगा नदीला लागून आहे. खनिज संपत्तीने विपुल असलेल्या या घाटावरून रात्रीच्या सुमारास अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. याची माहिती प्रशासनालासुद्धा आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर गावकऱ्यांनी अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला. त्यामुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती प्रशासनाला देऊन अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर प्रशासनाचा स्वाधीन करण्यात आला. तालुक्यात सध्या रेती घाटाचा लिलाव झाला नसून, अनेक रेतीघाटावरून रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. या सर्व प्रकारात प्रशासन मात्र उदासीन असल्याचे तालुक्यात चित्र आहे.