शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना 400 रुपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आल्याने मनपा, नगरपालिका, नगरपंचायत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंत्राटी वॉर्डबाॅयची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वॉर्डबाॅय आपला जीव धोक्यात घालून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची पॅकिंग करण्यापासून ते शिफ्टिंग करण्यापर्यंत अवघ्या ४०० रुपयांवर कोणत्याही विना तक्रारी माणुसकी डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. जिवाची जोखीम उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी मोबदला दिला जात आहे.

ठळक मुद्देवॉर्डबॉयला विमा कवचही नाही : वेळी-अवेळी जावे लागते कामावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसभर कोरोनाबाधितांच्या सहवासात राहून काम करतानाच जिवाला असलेला धोका विसरून मृतदेह हाताळणारे कंत्राटी वॉर्डबाय यांना दिवसाला केवळ ४०० रुपये मानधन देण्यात येत आहे. त्यातही विमा कवच नाही; परंतु लॉकडाऊनमुळे कुठेच काम नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आल्याने मनपा, नगरपालिका, नगरपंचायत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंत्राटी वॉर्डबाॅयची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वॉर्डबाॅय आपला जीव धोक्यात घालून कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची पॅकिंग करण्यापासून ते शिफ्टिंग करण्यापर्यंत अवघ्या ४०० रुपयांवर कोणत्याही विना तक्रारी माणुसकी डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत. जिवाची जोखीम उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी मोबदला दिला जात आहे. त्यामुळे त्यांचा सेवाभाव पाहून कायमस्वरूपी नोकरी सामावून घेण्याची मागणी होत आहे.  

पोट भरेल एवढे पैसे द्याबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक हात लावत नाहीत. याप्रसंगी हा मृतदेह उचलणार कोण, हा प्रश्न पडतो. अशावेळी वॉर्डबॉय मात्र मृताचे नातवाईक बनतात. त्यामुळे त्यांना पोट भरण्याइतके तरी मानधन दिले पाहीजे. उदरनिर्वाहासाठी त्यांना मृतदेह उचलण्याबरोबर इतर कामे करावी लागत आहे. परंतु, आता कोरोनामध्ये काम करीत असल्याचे लोकांना माहिती झाल्याने इतर काम देणेही बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना अडचण जात आहे.   

मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग, तरी कामाचे मोल नाही

रुग्णालयात काम करताना कामाचे तास ठरलेले नाही. वेळी अवेळी जावे लागते. रुग्णांचा जेव्हा मृत्यू होतो. तेव्हाच त्याची पॅकिग करण्यात येत असते. स्वत:ची काळजी घेत कामे करीत असतो. मात्र पाहीजे त्या प्रमाणात वेतन नाही,- वॉर्डबॅाय 

प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेने जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. परंतु, आमची कामची पाहीजे तशी दखल घेतली जात नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढेही वेतन दिले जात नाही.- वॉर्डबॉय 

नातेवाइक रुग्णला हात लावत नसताना आम्ही कमी मानधन मिळत असूनही प्रामणिक कर्तव्य बजावत आहोत. आम्हाला कायमस्वरुपी कामावर घेण्यात यावे. विमा कवच देण्यात यावा.वॉर्डबॉय 

मागील वर्षभरापासून कोरोना वॉर्डात काम करीत आहे. पण मानधन खूप कमी आहे. चांगले मानधन मिळाले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यास मदत होईल. -वॉर्डबॉय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या