महिलेच्या पिशवीतून ४९ हजार रुपये पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST2021-02-06T04:51:21+5:302021-02-06T04:51:21+5:30

गोंडपिपरी : तालुक्यातील टोमटा येथून गोंडपिपरी येथे आपल्या दिरासोबत येऊन वैयक्तिक आर्थिक कार्याकरिता येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून ...

Rs 49,000 snatched from woman's bag | महिलेच्या पिशवीतून ४९ हजार रुपये पळविले!

महिलेच्या पिशवीतून ४९ हजार रुपये पळविले!

गोंडपिपरी : तालुक्यातील टोमटा येथून गोंडपिपरी येथे आपल्या दिरासोबत येऊन वैयक्तिक आर्थिक कार्याकरिता येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून रोकड काढून गावाकडे परतताना जुना बसस्थानक परिसरात प्रसाधनास जाणाऱ्या महिलेच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४९ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली.

तक्रारीनुसार, गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. तालुक्यातील टोमॅटो येथील सखुबाई भुजंग कुळसंगे ही महिला आपल्या दीरासोबत गोंडपिपरी येथे आली. तिने बँक ऑफ इंडिया शाखा गोंडपिपरी येथून आपल्या खात्यातून ४९ हजार रुपये काढले व गावाकडे परत जाण्यासाठी जुन्या बसस्थानक परिसरात एसटीची वाट बघत उभी होती. याच दरम्यान लघुशंकेकरिता ती परिसरातील मोकळ्या जागेमध्ये गेली असता, परत आल्यानंतर पिशवी तपासताना तिला रोकड दिसली नाही. यामुळे तिने शोधाशोध घेत संपूर्ण पिशवी व परिसरात विचारपूस केली; मात्र रकमेचा थांगपत्ता न लागल्याने अखेर तिने गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदविली. यासंदर्भात गोंडपिंपरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास बीट जमादार माहुरकर करीत आहेत.

Web Title: Rs 49,000 snatched from woman's bag