शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरचे महिला रुग्णांशी असभ्य वर्तन

By admin | Updated: June 7, 2014 23:51 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेला छेद देत, उपस्थित कर्मचार्‍यांच्या नजरा चुकवून एक बोगस वैद्यकीय अधिकारी थेट महिला रुग्णांच्या कक्षात आला. त्याने महिलांची तपासणी सुरू केली. महिलांसोबत असभ्य

वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेला छेद देत, उपस्थित कर्मचार्‍यांच्या नजरा चुकवून एक बोगस वैद्यकीय अधिकारी थेट महिला रुग्णांच्या कक्षात आला. त्याने महिलांची तपासणी सुरू केली. महिलांसोबत असभ्य वर्तणूक करत तब्बल एक तास तपासणी करून तो निघून गेला. त्यात काही रुग्णांकडून तपासणीच्या नावाखाली त्याने रक्कम उकळल्याची माहिती आहे.वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात गरोदर रुग्ण, बाह्य तपासणी, अपघातातील जखमी, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असतात. अशा रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमले असून २४ तास वैद्यकीय कर्मचारी रुग्णालयात असतात. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सकाळी नियमित तपासणी उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांकडून केली जाते. उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक व कर्मचार्‍यांना अंधारात ठेवून शुक्रवारी एक इसम वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगत चक्क स्त्री रुग्णांच्या कक्षात दाखल झाला. महिला रुग्णांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या सांगण्याच्या आतच त्याने महिलांची तपासणी सुरू केली. तपासणी सुरू करताना त्याने अर्वाच्च भाषेत संभाषणही सुरू केले. हा प्रकार सुरू असताना एका रुग्णासोबत असलेल्या महिलेला संशय आला. त्या महिलेने तोतया वैद्यकीय अधिकार्‍यास खडसावल्याने त्याने रुग्णालयातून काढता पाय घेत पोबारा केला. तथाकथित वैद्यकीय अधिकारी चक्क महिला रुग्णांच्या कक्षात जाऊन त्यांची तपासणी करीत असभ्य वर्तणूक करतो. ही बाब कर्तव्यावर असणार्‍या कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येऊ नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.                     (तालुका प्रतिनिधी)