शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांसाठी दलालांकडून लूट

By admin | Updated: October 18, 2014 23:22 IST

अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांचीही ससेहोलपट सुरू आहे. दाखले मिळविण्यासाठी

टेमुर्डा : अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात सामान्य जनतेच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांचीही ससेहोलपट सुरू आहे. दाखले मिळविण्यासाठी दलाल मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करीत असल्याने सर्वसामान्यांची चांगलीच आर्थिक लुट सुरू आहे. याकडे मात्र, कर्मचारी, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.विद्यार्थी व शेतकऱ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. याचाच फायदा घेत अनेक विभागात दलाल सक्रीय झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दाखल्यांसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयात दररोज येरझारा मारुनही काम होत नसल्याने नागरिकांना दलालांच्या मार्फतीने काम करावे लागत आहे. अनेक दुरवरुन आलेले नागरिक ‘साहेब माझे काम करून द्या’ अशी विणवणी करतात. परंतु, त्यांना सर्व सामान्यांचे काहीच घेणे देणे नसते तर समस्या मागील साधे कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न अधिकारी, कर्मचारी करीत नाही. सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यातच मुलांना महाविद्यालयीन, प्राथमिक शिक्षणासाठी विविध दाखल्यांची गरज पडत आहे. पालक कामात असल्याने विद्यार्थीच दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयाचे उबंरठे झिजवत आहेत. तहसील कार्यालय, ग्राम पंचायत कार्यालय आदी कार्यालयात विद्यार्थी चकरा मारत असून दलाल मात्र, त्यांची सर्रास लूट करीत आहेत. कागदपत्रे त्वरित काढून देऊ, अशी बतावणी करून त्यांची आर्थिक लुट करतात. तर तहसील कार्यालय परिसरात व इतरही परिसरात काही अधिकृत अर्जनविसही विविध कागदपत्रासाठी मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत. यामध्ये काही लिपीक कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. सेतु केंद्रात काम करणारे कर्मचारीही हजारो रुपये प्रमाणपत्राच्या नावावर वसूल करीत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन लूट थांबविण्याची मागणी आहे. (वार्ताहर)