शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था

By admin | Updated: December 15, 2014 22:54 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांचीे कामे तातडीने करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने

सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांचीे कामे तातडीने करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकारम विभाग व लोकप्रतिनिधीकडे करण्यात आली आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या विविध कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीमुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होते. त्यामुळे परिसरातील रस्ते नेहमीच खराब होतात. या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वेकोलिही दुर्लक्ष करीत आहे. राजुरा तालुक्यातील साखरी गावाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांचीही अशीच अवस्था झाली आहे. यात साखरी- निमनी, साखरी- धिडशी, साखरी- हिरापूर, मार्ड-कुर्ली, निर्ली- चार्ली, साखरी- पेल्लोरा पांदन या रस्त्यांचा समावेश आहे. सदर रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या मार्गावरुन परिसरातील नागरिक, शेतकरी आवागमन करतात. शेतातील माल आणण्यासाठीही शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.वेकोलिमुळे परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र वेकोलिने नागरिकांच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. वेकोलिमुळे परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी संघर्ष युवा विकास मंडळाने केली आहे.(वार्ताहर)