जिवतीला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:21+5:30

तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची अवस्था बिकट असून जिवतीला जोडणारे रस्त्येही पाहिजे तसे ठिक नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा अपघातही घडत आहेत. काही रस्त्यांवर डांबरीकरण न करता केवळ गिट्टी पसरवून ठेवली आहे.

The roads that connect the living are in dire straits | जिवतीला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट

जिवतीला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी

न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर जिवतीचा विकास होऊन येथील जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा असतानाही आजही परिस्थिती पाहिजे तशी बदलली नाही. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेता, जिवती हा तालुका म्हणून अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची अवस्था बिकट असून जिवतीला जोडणारे रस्त्येही पाहिजे तसे ठिक नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा अपघातही घडत आहेत. काही रस्त्यांवर डांबरीकरण न करता केवळ गिट्टी पसरवून ठेवली आहे.
जिवतीचा मुख्य रस्ताही उखडला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची दयनिय अवस्था बघता लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यांवरूल गावाचा विकास साधता येतो. मात्र तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने गावाचा विकास काय झाला असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: The roads that connect the living are in dire straits