शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पिपरी येथील रस्ता नऊ वर्षांपासून रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामावर गावातील जॉबकार्डधारक यायचे. आठ दिवस काम सुरळीत सुरु होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना त्रास : अल्पमजुरीमुळे कामगारांचा काम करण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती: येथून जवळच असलेल्या पिपरी- घोनाड या पांदण रस्त्याचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०११ मध्ये सुरु करण्यात आले होते. या कामासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर काम सुरु झाले. मात्र, त्यानंतर कमी मजुरी असल्याचे कारण समोर करीत मजुरांनी कामावर येणे बंद केले. परिणामी मागील ९ वर्षांपासून रस्ता पूर्ण झालाच नसल्याने ग्रामस्थांना चिखल तुडवीत शेतात जावे लागत आहे. त्यामुळे मजुरांऐवजी यंत्राद्वारे रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत.भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामावर गावातील जॉबकार्डधारक यायचे. आठ दिवस काम सुरळीत सुरु होते. रोजगार हमी योजनेची मजुरी कमी असल्याने मजुरांनी येणे बंद केले. या कामापेक्षा शेतातील मजुरी अधिक मिळत असल्याचे कारण मजूर देत आहेत. प्रशासकीय कारणामुळे सदर काम मनुष्यबळाने करायचे असल्याने यंत्राद्वारे करताना अडचण निर्माण झाली आणि काम बंद पडले. कामाची सुरुवात झाली त्यावेळी येथील विद्यमान उपसरपंच संदीप खुटेमाटे यांच्याकडेच प्रभारी सरपंचपदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या पूर्णत्वासाठी प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुराव केला. मात्र, अजुनही या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा जागी झाली नाही. त्यामुळे निधी मंजूर होऊनही मजुरांअभावी पांदण रस्त्याचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून येथील नागरिकांना चिखत तुडवित शेतात जावे लागत आहे. त्यामुळे यंत्राद्वारे या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची मागणी केली जात आहे.पिपरी- घोनाड या पांदण रस्त्याच्या कामासाठी निधी आला आहे. मात्र, कामावर मजूर उपलब्ध होत नसल्याने काम थांबले आहे. मागील ९ वर्षांपासूनची स्थिती कायम आहे. त्यामुळे संबंधित विभागाने हे काम मनुष्यबळाने न करता यंत्राद्वारे करण्याची परवानही द्यावी. यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे.- संदीप खुटेमाटे, उपसरपंच, पिपरी (भद्रावती)

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरी