सेवानिवृत्त कोळसा खाण कामगारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:18+5:302021-02-10T04:28:18+5:30

घुग्घुस : वेकोलिच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैशाचा योग्य नियोजन करा, असा सल्ला सेवानिवृत्त झालेल्या कोळसा खाण कामगारांना खाण व्यवस्थापक आर.के. ...

Retired coal miners felicitated | सेवानिवृत्त कोळसा खाण कामगारांचा सत्कार

सेवानिवृत्त कोळसा खाण कामगारांचा सत्कार

घुग्घुस : वेकोलिच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैशाचा योग्य नियोजन करा, असा सल्ला सेवानिवृत्त झालेल्या कोळसा खाण कामगारांना खाण व्यवस्थापक आर.के. आचार्य यांनी निरोप समारंभात दिला.

वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीत कार्यरत कोळसा खाण कामगार निवृत्त झाले. त्यांना निरोप देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बरीच वर्षे कोळसा उत्पादनात महत्त्वाची भूमिका निभावत वेकोलिचे नावलौकिक केले. आज सेवानिवृत्त झाले. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खाण व्यवस्थापक व कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार वर्गांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सेवानिवृत्त कामगारांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन धनादेश देण्यात आले. याप्रसंगी मंचावर सुरेशसिंग गौर, रमाकांत शर्मा, विजयकुमार, कामगार नेते श्रीकांत माहुलकर, किशोर बोबडे, रमेश खरपकर यांची उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन अधीक्षक नारायण जांभुलकर यांनी केले.

Web Title: Retired coal miners felicitated