ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनर्जीवन

By Admin | Updated: June 25, 2015 01:17 IST2015-06-25T01:17:11+5:302015-06-25T01:17:11+5:30

पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत विविध प्रकारची कामे

Resurgence of the British Malguzari lake | ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनर्जीवन

ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनर्जीवन

गांगलवाडी : पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत विविध प्रकारची कामे उपलब्ध करून मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला जात आहे. बुधेवाडा येथे ब्रिटीशकालीन माजी मालगुजारी तलाव मागील २० वर्षापासून दुर्लक्षित होते. या तलावाचा सलांग जुन्या काळात दगडानी बांधलेला असल्यामुळे जीर्ण होऊन वाहून गेला होता. तुडूंब नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण जात होती. तळोधी खुर्दचे सरपंच प्रमोद मोटघरे व संवर्ग विकास अधिकारी तोडावार यांनी प्रयत्न करुन तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीचे काम पूर्ण केले. तसेच तलावास दोन तुडूंब व नवीन सलांग व तलावाच्या पाळीचे मातीकाम राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्यात आले. शुन्य सिंचनावर आलेला तलाव आता ४० हेक्टर सिंचन करू शकतो. तसेच या तलावापासून निघालेल्या सांडव्याचे रूपांतर समोर नाल्यात होऊन तो चार किमी अंतर गोगाव येथील मोठ्या नाल्याला मिळतो. या नाल्यावर पाच साखळी बंधाऱ्याचे बांधकाम नियोजित आहे. जेणेकरून तलावातील जास्तीचे पाणी सांडव्यावरुन निघून या पाच बंधाऱ्यात साठविल्या जाऊ शकते व या पाण्यापासून १५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येवून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

Web Title: Resurgence of the British Malguzari lake