शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प

By admin | Updated: December 10, 2014 22:55 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा

बल्लारपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वच्छ भारत मिशनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. पहिल्या टप्प्यात बल्लारपूर तालुका निर्मल करण्याचा संकल्प करून विसापूर, चुनाभट्टी, बामणी (दुधोली) व काटवली (बामणी) गावातील लोकांच्या भेटी घेऊन लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे लोकचळवळ निर्माण झाली असून लोकप्रतिनिधी शौचालयासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित करीत असल्याचे चित्र आहे.
रविवार सुटीचा दिवस असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मजेचा दिवस असतो. मात्र याला फाटा देत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते, कृष्णकांत खानझोडे, संजय धोटे यांचा ताफा पहिल्यांदा विसापूरला धडकला. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, सरपंच बंडू गिरडकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच शाम वैद्य यांच्यासह चर्चा करून प्रस्तावित शौचालय बांधकामाची पाहणी केली. बामणी (दुधोली) येथे सरपंच सुजाता टिपले, माजी सभापती हरिष गेडाम, ग्रामपंचायतीच्या सदस्य सत्यशीला साळवे व निर्मल दूत यांच्या समवेत बैठक घेऊन वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी कोणत्याही स्थितीत लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित न ठेवण्याचे निर्देश संवर्ग विकास अधिकारी गजभे व ग्राम विकास अधिकारी ढुमणे यांना देण्यात आले. काटवली येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, माजी उपसभापती सुमन लोहे, सरपंच माधुरी ढुमणे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)