शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त करण्याचा संकल्प

By admin | Updated: October 19, 2015 01:32 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाली असली तरी राजुरा तालुक्यातील विरूर येथे मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने हातभट्टी,

महिला झाल्या आक्रमक : पोलीस ठाण्यातच घेतली सभाविरूर (स्टे) : चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाली असली तरी राजुरा तालुक्यातील विरूर येथे मागील सहा महिन्यांपासून छुप्या मार्गाने हातभट्टी, मोहफूल व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री जोमाने सुरू आहे. दारूच्या आहारी गेलेल्यांचे सुखी कुटूंब उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान, विरूर (स्टे) येथील महिलांनी एकत्र येऊन महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर मोरे, सरपंच भास्कर सिडाम व विरूरचे ठाणेदार यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यात सभा आयोजित करून विरूरात चाललेले अवैध दारू विक्री बंद करण्याचा संकल्प केला.गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदारांनी केले असून यामुळे अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंद झाल्यापासून अवैधरीत्या छुप्या मार्गाने हातभट्टी, मोहफुल व देशी-विदेशी दारू विक्रीत सतत वाढ होत असल्याने गावातील मोठ्यांबरोबर तरुण व अल्पवयीन मुलेसुद्धा दारूच्या आहारी जात आहे. येथे बहुतेक जनता गरीब, आदिवासी, शेतमजूर, शेतकरी आहेत. मोलमजुरी करून पोट भरणारे गरीब जनता मजुरीचे पुर्ण रक्कम दारूमध्ये घालवित आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दररोज तंटे, झगडे, कौटुंबीक कलह निर्माण होऊन अनेकांचे संसार कोलमडण्याच्या अवस्थेत आहेत. सतत वाढ होत असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. यावर उपाययोजना करण्याकरिता विरूर येथील ठाणेदार, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांना बोलावून दारू व इतर समस्याबाबत चर्चा केली. तेव्हा गावातील महिलांनी वर्ग व नागरिक ठाण्यासमोर सभा आयोजित केली. यात गावातील २५० ते ३०० महिला उपस्थित होते. यात ठाणेदारांनी दारूचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. गावातील अवैध दारू पुर्णपणे बंद करण्यासाठी गावातील नागरिकांची व महिलाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. दारू कोणत्या वार्डात व मोहल्यात विकली जात आहे. हे आम्हाला कळवून सहकार्य केल्यास दारू बंद होण्यास मदत होईल, असे सांगीतले. तसेच गावात पोलीस मित्र तयार करून गावात चालण्याच्या अवैध धंद्यावर आळा बसेल, असेही सांगीतले. यावर उपस्थित महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत होकार दिला. यामुळे अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आता विरूरातील अवैध दारू बंदी होईल काय, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)