शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

By admin | Updated: April 20, 2015 01:14 IST

शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे.

वरोरा : शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे. हे वीज खांब हटविण्याकरिता जिल्हा नियोजन समितीने ४२ लाखांचा निधी दिला. परंतु वीज खांब हटविण्याचे काम मागील दोन वर्षापासून रेंगाळले आहे. परिणामी आजही वरोरा शहरातून दुचाकी व चारचाकी वाहन घेऊन जाताना रस्त्यावरील वीज खांबाचा सामना करावा लागत आहे.वरोरा शहरातील प्रभाग-१ पोलीस ठाणे ते रेल्वे पूल, प्रभाग दोन मध्ये जाजू हॉस्पिटल ते पोलीस ठाणे, जिल्हा सहकारी बँक ते माढेळी रोड, पाण्याची टाकी ते जुने बसस्थानक, वणी नाका बायपास, विश्रामगृह ते रेल्वे पूल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते माढेळी रोड, शिवाजी चौक ते विश्रामगृहापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर एल.टी. लाईन व ११ केव्हीचे वीज खांब रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. यामध्ये काही रोहीत्रांचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गावर विद्युत पोल असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. रात्रीच्या वेळी या खांबांवर वाहने आदळून अपघात होत आहेत. अनेकदा या खांबांना जडवाहनांची धडक बसली. त्यामुळे खांबावरील वीज तारा तुटून तासन्तास विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वरोरा नगरपालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वीज खांब हटविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला. तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नही केले. त्यानंतर सन २०१२-२०१३ मध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये मान्यता मिळून एलटी लाईन व ११ केव्ही लाईनचे वीज खांब हटविण्यासाठी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या कामाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करुन नगरपालिकेच्यावतीने २४ एप्रिल २०१३ रोजी तांत्रिक मंजुरीसाठी तो प्रस्ताव महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे न.प.ने पत्र व्यवहार केला. या कामासाठी एक वर्षापूर्वी निविदा काढून कंत्राटदाराला वर्कआॅर्डर देण्यात आली. परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटूनही वरोरा शहरातील विद्युत खांब हटविण्याच्या कामाला आजपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही. नगरपालिका प्रशासनाने पत्रव्यवहार व ेनिविदा काढीत कंत्राटदारांची नेमणूक केल्यानंतरही अशा कामात विलंब होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)