शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बंडखोरांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 05:00 IST

बंडखोरी करणाऱ्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  काही बंडखोर दिग्गजांना आमिषे दाखवून माघार घेण्यास भाग पाडले जाणार आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत गोड गोड बोलून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. सरपंचपदाची इच्छा मनात ठेवून स्थानिक नेतेमंडळींनी निवडणुकीची व्यूहरचना केली. 

ठळक मुद्दे८५ ग्रामपंचायतींसाठी १४७३ नामांकन पात्र

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर :        तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायतमधील २६७ वाॅर्डासाठी एक हजार ४९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी एक हजार ४७३ नामांकन पात्र झाल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या तर काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी केली जात आहे.या बंडखोरांना माघारीसाठी गोड गोड आश्वासने दिली जात आहेतण मात्र, ही आश्वासने भविष्यात पाळली जातीलच याची खात्री नसल्याने बंडखोर उमेदवार सावध झाले आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेतले जाणार आहे. यानंतर तत्काळ उमेदवारांना चिन्ह वाटप होतील. तालुक्यातील   थंडीतही आखाडा तापला असून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव होत आहे. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने आता माघार कोण कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून पॅनल प्रमुखांचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  काही बंडखोर दिग्गजांना आमिषे दाखवून माघार घेण्यास भाग पाडले जाणार आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत गोड गोड बोलून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. सरपंचपदाची इच्छा मनात ठेवून स्थानिक नेतेमंडळींनी निवडणुकीची व्यूहरचना केली. 

सरपंच पदाकडे लक्षमहाविकास आघाडीने अचानक निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. सरपंच पद हे गावचे मोठ्या सन्मानाचे मानले जाते. त्यामुळे या पदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे. 

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या काही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिकांसह तालुका व जिल्हास्तरावरील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. यात कोण कुणाची कुरघोडी कशी करतो, हे निकालानंतरच समजणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक