शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आधी निधी उभारा; नंतर योजना सुरू करा

By admin | Updated: July 6, 2017 00:43 IST

नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे.

जलबिरादरीचे आमदारांना निवेदन : अमृत योजनेसाठी तज्ज्ञांच्या समितीची गरज लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागरिकांना मुबलक पाणी देणारी महत्त्वाकांक्षी अमृत योजना महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र या योजनेसाठी मनपाला ६५ ते ७० कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. मनपाचे उत्पन्न लक्षात घेता एवढा मोठा निधी योजनेच्या कालावधीत उभारणे कठीण आहे. निधीअभावी योजनेची वाट लागण्याची शक्यता असल्याने मनपाने आधी निधी उभारावा, नंतरच योजनेची सुरूवात करावी. सोबतच या योजनेसाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन आमदार नाना श्यामकुळे यांना दिल्याची माहिती जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. महानगरपालिकेद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचा जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यामध्ये शहराच्या तीन लाखांवर असलेल्या लोकसंख्येला दरडोई १३५ लिटर पाणी दररोज उपलब्ध होणार आहे. योजनेचा पहिला टप्पा २३१ कोटी रुपये अंदाजपत्रकाचा आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचे २५ टक्के व मनपाचे २५ टक्के म्हणजे ५७ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्याच्या कामासाठी लागणार आहे. या व्यतिरिक्त सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करताना अंदाजपत्रकाचे दर हे जुने देण्यात आल्यामुळे निविदेचा जो जादा दर आला, त्याच्या फरकाची रक्कम ही सुमारे सहा ते आठ कोटी असणार आहे व हा बोझा मनपालासहन करावा लागणार आहे. याशिवाय सुमारे ५० हजार नळधारकांना मीटर लावण्यासाठी प्रति मीटर २२०० रुपये प्रमाणे ११ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. एकंदरीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करताना महानगरपालिकेला ६५ ते ७० कोटींचा निधी उभा करावा लागेल. हा निधी मनपा कसा उभारेल, असा प्रश्नही त्यांनी निवेदनात केला आहे.१९९८ ची पुनरावृत्ती होऊ नये१९९८ मध्ये अशीच वाढीव पाणी पुरवठा योजना मनपाने हाती घेतली होती. ३८ कोटींची ही योजना होती. या योजनेसाठी साहित्यही खरेदी केले होते. मात्र ही योजना आजतागयत पूर्ण होऊ शकली नाही. कोट्यवधींच्या भूमिगत मल:निस्सारण योजनेचीही तसेच झाले. त्यामुळे अमृत योजनेसाठी शहरातील अनुभवी व तज्ज्ञ नागरिकांची समिती स्थापन करावी, अशी मागणीही संजय वैद्य यांनी आमदारांकडे केली आहे.