शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या रिकाम्या बाटल्यांची खरेदी संशयात

By admin | Updated: December 26, 2015 01:23 IST

वरोरा येथील काही भंगार दुकानातून देशी दारूच्या खाली बाटल्यांची खरेदी केली जात आहे.

भंगार दुकानात खरेदी : बनावट दारू निर्मितीची शक्यताचंद्रपूर: वरोरा येथील काही भंगार दुकानातून देशी दारूच्या खाली बाटल्यांची खरेदी केली जात आहे. रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन ती सदर बाटल्यात भरुन विकली जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अवैध दारूविक्रीला आळा घालण्यात प्रशासनाला यश आले नाही. यवतमाळ, नागपूर या लगतच्या जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरु असल्याचे अनेक प्रकरणातून उघड झाले आहे. काही अवैध दारूविक्रेते कमी अवधीत जास्त पैसे कमाविण्याच्या मोहात परप्रांतातील स्वस्त दारूची तस्करी करुन ती चढ्या दराने विकत आहे. अशा विक्रेत्यांवर पोलिसांची नजर असली तरीही दारूसाठा आणल्या जातो. काही अवैध दारूविक्रेत्यांनी शक्कल लढवून रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन तिची विक्री सुरु केली आहे. यासाठी इथेनॉल, स्पीरिटचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.नागपूर- चंद्रपूर या राज्य महामार्गावरील एका व्यावसायिकांकडून नेहमी वरोरा येथील भंगार दुकानातील देशी दारुच्या खाली बाटल्याची खरेदी केल्या जाते, अशी माहिती आहे. या बाटल्यांची स्वच्छता आणि नाविन्यता यानुसार त्यांच्याकडून रिकाम्या बाटल्यांना भाव दिला जातो. रासायनिक पदार्थापासून दारू तयार करुन ती या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरुन विकली जाते. यामुळे दारू पिणाऱ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे.विषारी दारूमुळे मुंबई जवळील मालवण येथील घटनेत शंभरपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. वरोरा तालुका परिसरात असा प्रकार सुरु असल्यास त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने दारूजन्य रासायनिक पदार्थ जिल्ह्यात आणणे कठीण नाही. यामुळे पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगून तपास करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)