शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

धान पट्ट्यात २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST

चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश असला तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात.

ठळक मुद्दे२५३५ असा भाव : लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून धानास जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल आदिवासी विकास महामंडळाकडे यावर्षी मोठया प्रमाणावर वाढला. आदिवासी विकास महामंडळाच्या चिमूर प्रकल्पात २६ आदिवासी सोसाट्यांमार्फत धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चच्या आकडेवारीनुसार या २६ सोसायटयांनी धान उत्पादक तालुक्यातील तब्बल २ लाख ३ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे.चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश असला तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात.शासनाने यावर्षी आदिवासी सोसायटयांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले होते. या सोसायटयांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व सानुग्रह २०० रुपये असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न केला. उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार १०० रूपयांच्या पलिकडे गेले नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाच्या केंद्रावरच धान विक्री केली.दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायटया व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायटयांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता.३० एप्रिलपर्यंत धान खरेदीआदिवासी विकास महामंडळाकडून ही धान खरेदी ३१ मार्चपर्यंतच करण्यात येणार होती. मात्र सध्या कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने ही धान खरेदीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती चिमूर आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक जी. आर. राठोड यांनी 'लोकमत'ला दिली.पणन महासंघाकडूनही खरेदीनागभीड तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी तर करण्यात आलीच, पण त्याचबरोबर पणनमहासंघाकडूनही मोठया प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. पणन महासंघाचे नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र होते. ही दोन्ही केंद्र धान उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या केंद्रांवर मोठया प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. पण तपशिल प्राप्त होऊ शकला नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड