शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या विकासासाठी परिचय मेळावे योग्य व्यासपीठ

By admin | Updated: January 15, 2016 01:44 IST

सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते.

शांताराम पोटदुखे : तेली समाज उपवर- वधू परिचय मेळावाचंद्रपूर : सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी परिचय मेळाव्यासारखे उपक्रम आवश्यक असून या माध्यमातून समाज एकत्र घेऊन समाजाचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे परिचय मेळावे समाजाच्या विकासासाठी चांगले व्यासपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले. तेली युवक मंडळ चंद्रपूरच्या वतीने मातोश्री सभागृह तुकूम येथे आयोजित उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवराव बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे, मेडिकल कॉलेजचे अधिव्याख्याता डॉ. चारुहास आखरे, डॉ. चेतन उराडे, सुनील बन्सोड, शोभा पोटदुखे, प्रा. वासुदेव रागीट, माजी नगरसेवक रावजीे चवरे, बबनराव फंड, नरेंद्र बुरांडे, राजेंद्र आखरे, शंंकर उराडे, चंद्रशेखर घटे, अनिल खनके, महेश बारई, पाडूरंग चन्ने, सुमन उमाटे, नगरसेवक आकाश साखरकर, योगेश समरित, देवेंद्र बेले, मनोहर बेले, रमेश भुते, प्रा. मधूकर रागीट, रेखा वैरागडे, राजू रघाताटे, प्रमोद हजारे, शैलेश जुमडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.पुढे बोलताना पोटदुखे म्हणाले, उपवर- वधूंचे लग्न जुळविताना कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागते. वेळ, पैसा खर्च होतो. परंतु परिचय मेळाव्यापासून उपवर- वधू त्यांच्या पसंतीचे ठिकाण एकाच ठिकाणी बघायला मिळते. शिवाय संपूर्ण समाजबांधव एकत्र येत असल्याने त्यांच्यात एकीचे बळ दिसून येते. त्यामुळे असे उपक्रम वारंवार व्हावेत, असे ते म्हणाले.यावेळी अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान कार्यक्रमात समाजातील उपवर- वधूंची माहिती असलेल्या ‘प्रेरणा-१६’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मेळाव्यात २०० हून अधिक उपवर- वधूंनी परिचय दिला. कार्यक्रमात मुख्याध्यापक शंकर उराडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बंडू बिजवे यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी केले. (शहर प्रतिनिधी)