शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

मागील दीड महिन्यांपासून या संकटाचा सामना करताना अनेकांची दमछाक झाली आहे. बांधकाम मजुरही अडचणीत सापडले आहेत. हाताला काम नाही. त्यामुळे पैशाची चणचण भासू लागली आहे. वर्षभराचा कौटुंबिक खर्च याच कालावधीत मिळलेल्या उत्पादन्नातून भागवण्यास मोठी मदत होत असताना लाकडाऊनमुळे संपूर्ण ग्रामीण अर्थचक्र मोडकळीस आले आहे.

ठळक मुद्देग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली : निराधार व निराश्रितांना मोठी अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : ग्रामीण भागातील अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. कोरोना विषाणूच्या जगभरातील उद्रेकाने सर्वजण जागच्या जागीच थांबून आहेत. तर ग्रामीण भागतील व्यावसायिकांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागातील छोटे उद्योग व व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडले आहेत. ग्रामीणांच्या कुटुंबाचा आधार असलेले चहा टपऱ्या, भजे विकणारे, न्हाव्यांची दुकाने, इस्त्री करणारे, बुरड कामगार, शिंपी, व्यवसायिक फोटो स्टुडिओ, थंड पेय विकणारे अशा छोट्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. या व्यवसायात अनेक निराधार परितक्त्या, विधवा महिलांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायांवर अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा याच व्यवसायांवर उभा आहे. कोरोनाच्या विषाणूच्या भीतीपोटी सारेच हतबल झाले आहेत.मागील दीड महिन्यांपासून या संकटाचा सामना करताना अनेकांची दमछाक झाली आहे. बांधकाम मजुरही अडचणीत सापडले आहेत. हाताला काम नाही. त्यामुळे पैशाची चणचण भासू लागली आहे. वर्षभराचा कौटुंबिक खर्च याच कालावधीत मिळलेल्या उत्पादन्नातून भागवण्यास मोठी मदत होत असताना लाकडाऊनमुळे संपूर्ण ग्रामीण अर्थचक्र मोडकळीस आले आहे.शासनाकडून मिळणारी तंटपुजी मदत केवळ स्वाभीमानापोटी न घेणारे अनेक व्यवसायिक आहेत. त्यांच्या कुटुंबियांची मोठीच फजीती होताना दिसत आहे. हातावर आणून पानावर खाणाºया मजुरांची मोठी दयनीय अवस्था झालेली आहे.परराज्यात मजूरीकरिता गेलेल्यानांही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. परिणामी त्यांची आर्थिक स्थिती सुधारली असेही म्हणता येणार नाही. लाकडाऊन वाढविण्याची परिस्थिती निर्माण झाली तर भविष्यात शेती उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोंडावर खरीप हंगाम आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद झाल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न आवासून उभा आहे. या सर्व अडचणीचा विचार करुन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालणा देण्याच्या दृष्टीने शासन प्रशासनाने योग्य पाऊले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे.मदतीसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावाकोराना व्हायरसमुळे हातावर पोट असणाºयांच्या पोटाचे प्रचंड हाल होत आहेत. रोजचा व्यवसाय करुन रात्री चूल पेटणाºया घरात चिंता आहे. कोरोनाचा व्हायरसचा धोका कधी टळणार आहे, याबाबत काहीच कल्पना करता येत नाही, जोपर्यनत कोरोना व्हायरस पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. सध्या सर्व शहरे लॉक झाली आहेत. त्यामुळे मोठमोठ्या व्यापाºयांनाही आपली दुकाने बंद करावी लागली आहेत. साहजिकच रस्त्यावर बसून विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणाºया व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाला आहे. रोज होणाºया कमाईतून त्यांचे पोट अवलंबून आहे अशा छोट्या व्यावसायीकांचे जगणे यामुळे मश्किल होत चालले आहे.काही व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बºयापैकी आहे. मात्र, काहीची स्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे यांच्यासाठी शहर, तालुक्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आदींनी पुढकार घेणे गरजेचे आहे.छोट्या व्यावसायिकांमध्ये हातगाड्यांबरोबरच पानटपºया, चहाचे गाडे, छोटे हॉटे, खाद्यपदार्थाचे गाडे, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ विक्रेते, पंक्चर काढणारे, चप्पल शिवणारे, विविध वस्तू दुरुस्त करणारे आदी व्यावसायांचा समावेश आहे. शहरात फिरुन भीक मागून खाणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या लोकांनाही रोजचे अन्न मिळणे कठीण झाले आहे.

टॅग्स :businessव्यवसाय