शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतच पिकाला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे.

ठळक मुद्देओले असल्याचे कारण : ३७१० रुपये हमीभाव, खरेदी दोन हजारात

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला खासगी व्यापाऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची डोळ्यादेखत फसवणूक करण्यात येत आहे. मात्र याकडे सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ओले असल्याच्या नावावर खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट करीत आहे. कवडीमोल भावात खासगी व्यापारी सोयाबीनची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सोयाबीनला ३ हजार ७१० रुपये हमीभाव असताना सोयाबीन ओले असल्याच्या नावाखाली खासगी व्यापारी सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. एवढया मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची खासगी व्यापारी लूट करीत असल्याने सरकारी यंत्रणा मात्र गप्प आहे. शेतकºयांचे कैवारी समजले जाणारे राजकीय पुढारी शेतकºयांच्या समस्या जाणून घ्यायला अजिबात तयार नाही. परतीच्या पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा सुल्तानी संकट शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कोणी वालीच उरला नसल्याने शेतकरी नाईलाजाने सोयाबीनची विक्री करीत आहे. यात व्यापाºयांचे फावत आहे.नाफेडची सोयाबीन खरेदी बंदचराजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी नाफेडची खरेदी करण्यात येते. मात्र दिवाळी होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी नाफेडची शासकीय खरेदी अद्यापही सुरू करण्यात आली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापारी सोयाबीनचा लिलाव दुपारनंतर करीत असल्याने शेतकºयांना नाईलाजाने रात्रीपर्यंत ताटकळत राहावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती