शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब अद्यापही महामार्गावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाचे वर कालावधी होत असला तरी विद्युत पोल ...

नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाचे वर कालावधी होत असला तरी विद्युत पोल मात्र अद्याप महामार्गावरच आहेत. पोल रस्त्यावरच असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय बाब ही की, येथील जुना बसस्थानक ते टी पाईंट चौक या वर्दळीच्या ठिकाणीच हे विद्युत खांब उभे आहेत.

नागभीड-आरमोरी हा पूर्वी राज्य महामार्ग होता. हा राज्यमार्ग रूंदीने लहान होता. विद्युत वितरण कंपनीनेही राज्य महामार्गाच्या नियमानुसार अंतर राखून विद्युत पोल लावले होते. मात्र आता या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढल्यामुळे हे विद्युत खांब आता रस्त्यावर आले आहेत.

उमरेड आरमोरी या राष्ट्रीय महामार्गातील नागभीड आरमोरी या टप्प्याचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर हे पोल हटविण्यात येतील अशी नागरिकांची अपेक्षा होती.मात्र हे पोल आताही तसेच आहेत. विशेष म्हणजे नागभीड नगर परिषदेतच समाविष्ट असलेल्या सुलेझरीपासून समोर ब्रम्हपुरीकडे जाणाऱ्या याच राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब हटवून ते सुरक्षित अंतरावर लावण्यात आले आहेत. मात्र ऐन वर्दळीच्या असलेल्या येथील जुना बसस्थानक ते टी पाईंट चौकापर्यंत जे खांब लावण्यात आले आहे ते अद्यापही ''''''''जेसे थे'''''''' आहेत.

दरम्यान यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित विभागाने या महामार्गाचा अंदाजपत्रक बनवतेवेळी जुना बसस्थानक ते टी पाईंटचौकपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याच्या बाबीचा उल्लेख अंदाजपत्रकात केला नव्हता अशी माहिती दिली. बाकी सर्व रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे एखादेवेळेस अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने आता या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणारी कंपनीने येथून गाशा गुंडाळला असला तरी या रस्त्याचे देखभाल करण्यासाठी एक युनिट नेहमीच सक्रिय आहे. येथील नगर परिषदेने संभाव्य धोका टाळण्यासाठी हे विद्युत खांब हटविण्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.