रस्त्यावर फिरल्यास पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:19+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Police action on the streets | रस्त्यावर फिरल्यास पोलीस कारवाई

रस्त्यावर फिरल्यास पोलीस कारवाई

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. कोरोना विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपकार्तून होत असतो. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाली आहे. रस्त्यावर गर्दी अथवा फिरताना दिसल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. संकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहततील.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात विदेशातून आलेल्या ४ नागरिकांना निगराणी ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या ८ नागरिकांना उत्तम आरोग्यानंतर धोक्याबाहेर सांगण्यात आले. आणखी ६ नव्याने विदेशातून आलेल्या नागरिकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पुणे,मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक होम कॉरेन्टाईन करण्यात आलेले आहेत. यापैकी काही प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आले आहे. त्यांना केवळ पुढील १४ दिवस काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्या पद्धतीची लक्षणे दिसल्यास आरोग्य यंत्रणेची मदत घेणे अनिवार्य आहे. मात्र स्वत:ला धोक्यात समजण्याचे कारण नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

स्टॅम्प मारले म्हणजे कोरोनाचे रूग्ण नव्हे
परदेशातून तसेच पुणे,मुंबई या ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. या सर्वांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे व होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. अशा व्यक्तींनी कुठेही न जाता त्यांनी १४ दिवस घरातच स्वतंत्र खोलीमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. या गृहभेटी आशा,अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत देण्यात आल्या. दोन दिवसात ग्रामीण भागात सर्व तालुक्यामध्ये २ हजार ६६६ नागरिकांची नोंद घेण्यात आली. विदेशातून बाहेरून आलेले अन्य राज्यातून आलेले सर्व नागरिक यामध्ये आले आहेत.

Web Title: Police action on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.