शेतातील मशरुम खाल्ल्याने दहा लोकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:19+5:30

घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरुम उगवले होते. शेतीलगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. जनता कर्फ्यु असल्याने फळ, भाज्या यांची दुकाने बंद आहेत. परिणामी शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली. समीर भोयर याच्या शेतातील मशरुम घरी आणल्यानंतर परिसरातील लोकांना देण्यात आले.

Poisoning ten people by eating field mushrooms | शेतातील मशरुम खाल्ल्याने दहा लोकांना विषबाधा

शेतातील मशरुम खाल्ल्याने दहा लोकांना विषबाधा

googlenewsNext
ठळक मुद्देरुद्रापूर येथील घटना : सर्व विषबाधित एकाच गावातील

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : शेतात उगवणारे मशरूम खाल्याने दहा जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
समीर भोयर (२२), शुभम भोयर (२०), प्रणोती भोयर (१७), चंद्रकला भोयर (३४), तेजस्विनी कुकुडकर (१३), दुर्गा कुकुडकर (११), सानिका कुकुडकर (१५), दत्ता कडस्कर (५), वर्षा कडस्कर (२५), विमल कडासकर (५०) अशी विषबाधा झालेल्यांची नावे असून हे सर्व रुद्रापूर येथील रहिवाशी आहे.
घटनेच्या दिवशी रुद्रापूर येथील समीर भोयर यांच्या शेतात दोन किलो वजनाचे मशरुम उगवले होते. शेतीलगत हा भाग असल्याने शेतात विविध जातीच्या फळभाज्या लावल्या जातात. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो. जनता कर्फ्यु असल्याने फळ, भाज्या यांची दुकाने बंद आहेत. परिणामी शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली. समीर भोयर याच्या शेतातील मशरुम घरी आणल्यानंतर परिसरातील लोकांना देण्यात आले. मात्र हे मशरुम विषारी असल्याने त्याची भाजी खाल्ल्यानंतर लगेचच सर्वांना उलटी, पोटदुखी, तोंडातून फेस येणे आदी विकार सुरू झाले. त्यामुळे त्यांना ताबडतोब सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. जखमीपैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रणोती भोयर, दुर्गा कुकुडकर, विमल कुकुडकर या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

Web Title: Poisoning ten people by eating field mushrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य