पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांत आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:08+5:302020-12-04T04:56:08+5:30

अनेकांचा सहभाग : सिंदेवाही येथील युवकांचे आयोजन सिंदेवाही : येथे एचटीसीएल संस्थेद्वारा मिशन पोलीस भरती अंतर्गत आंबोली मैदानावर शारीरिक ...

Pleasure among students with pre-recruitment training | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांत आनंद

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांत आनंद

अनेकांचा सहभाग : सिंदेवाही येथील युवकांचे आयोजन

सिंदेवाही : येथे एचटीसीएल संस्थेद्वारा मिशन पोलीस भरती अंतर्गत आंबोली मैदानावर शारीरिक शिक्षण तथा दर रविवारला निर्मल नगरी येथे स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर घेतला जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना लाभ होत असून भविष्यात त्यांना याचा फायदा होणार असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.

कोरोना संकटामुळे सिंदेवाही तालुक्यातील अनेक उत्सुक तसेच प्रत्येकच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसल्याने शहरात जाऊन अभ्यास व सराव करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन सिंदेवाही तालुक्यातील व तालुक्याबाहेरील विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे या उद्देशाने पोलीस भरती प्रशिक्षण सूरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मैदानी सराव व्हावे म्हणून सकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत शारीरिक सराव तसेच सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा वर्ग व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

स्पर्धा परीक्षा वर्गात गणित, मराठी व सामाजिक विषयासंबंधित माहिती दिली जात आहे. प्रत्येक रविवारी सराव पेपर घेतले जात आहे. प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता अजय कटारे, शुभम मंडलवार, प्रा.जितेंद्र बेलोरकर, बालू सोयाम, विशाल मंडलवार, हर्षल मंडलवार, जावेद पठाण आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Pleasure among students with pre-recruitment training