शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख वृक्षांचे रोपण

By admin | Updated: July 7, 2017 01:04 IST

राज्य शासनाने यावर्षी घेतलेला चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही

उद्दिष्ट ओलांडणार : महोत्सवाचा आज अखेरचा दिवस लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्य शासनाने यावर्षी घेतलेला चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३८ लाख २७ हजार २४४ वृक्षांची लागवड करण्यात आली. शुक्रवार शेवटचा दिवस असून जिल्ह्यातील सर्व यत्रणांनी आपले उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. १ ते ७ जुलै या काळातील वृक्षलागवडीमध्ये चंद्रपूर जिल्हयाने सुरुवातीपासून आघाडी घेतली असून या उपक्रमाच्या सहाव्या दिवशीच राज्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा आनंद चंद्रपूरकरांनी साजरा केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूर व अमरावती दौऱ्यावर असतानाच त्यांना चार कोटी वृक्षलागवड झाल्याचे कळले. त्यानंतर चंद्रपुरातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले असून शुक्रवारी शेवटच्या दिवशी जिल्हयातील सर्व यंत्रणा ४० लाखांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल, असे स्पष्ट केले आहे. शासनाने महानगरपालिकेला केवळ १५ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र महापौर अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेने ३० हजारांचे स्वत:चे उद्दिष्ट केले होते. आता या उद्दिष्टाला जवळपास दोन हजार वृक्षलागवड कमी असून शुक्रवारपर्यंत हे लक्ष पूर्ण केले जाईल, असे सुतोवाच मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले आहे. जिल्हयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून आतापर्यंत ११ हजार ६१८ वृक्ष लावले आहे. शुक्रवारपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी सांगितले आहे. वरोरा येथे बुधवारी मोठया प्रमाणात वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत सर्व नगरपरिषदा, ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था मोठया प्रमाणात योगदान देवून या कार्यक्रमाचा विक्रमी लागवडीने समारोप करतील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. जि.प. व मनपाचे आकडे ४वनमहोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे यांनी तीन लाख ८० हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले होते. त्यासाठी त्यांनी वृक्षदिंडीचा अभिनव प्रयोग केला होता. ५० गावांमध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेने चार लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचा विक्रम केला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चार लाख १८ हजार ७३१ वृक्ष लागवड झाली होती. चंद्रपूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ३० हजारांच्या आपल्या उद्दिष्टाच्या जवळपास मजल मारली आहे. आज गुरुवारी तीन हजार ५२ वृक्ष लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेने आतापर्यंत २८ हजार १८८ वृक्षलागवड केली आहे.