शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेले इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर; उपसरपंचांकडून चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 19:56 IST

भुरसे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली त्यानंतर भुरसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांना बोलावून माहिती दिली

ठळक मुद्देमिळून आलेल्या इंजेक्शन्सची चौकशी केली असता ते सन २०१८ चे असल्याचे निष्पन्न झाले. गावात २६ मे रोजी करण्यात आलेल्या लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेले इंजेक्शन्स नष्ट करण्यात आले आहे.

सावली (चंद्रपूर): तालुक्यातील सोनापूर येथे खाताच्या ढिगाऱ्यावर रिकामे इंजेक्शन्स अस्ताव्यस्त आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासह ग्रामीण भागातही कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाकडून नागरिकांना मोफत लसीकरणाचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. याचदरम्यान सोनापूर येथे २८ मे रोजी ४५ वर्षांवरील ३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर काही दिवसांनी रिकामे इंजेक्शन्स खाताच्या ढिगाऱ्यावर अस्ताव्यस्त उघड्यावर पडलेले दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी उपसरपंच मुकेश भुरसे यांना या प्रकरणाची माहिती दिली. 

भुरसे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली त्यानंतर भुरसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांना बोलावून माहिती दिली. याबाबत चौकशी केली असता संबंधित लसीकरण करणाऱ्या परिचारिका यांनी लसीकरण केलेले सर्व रिकामे इंजेक्शन्स नष्ट केल्याचे सांगितले. परंतु रिकामे इंजेक्शन्स गावाच्या वेशीवर टाकले कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या इंजेक्शन्समुळे गावातील आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच गावावर कोविडचे संकट येऊन गेले होते. तसेच तापाची साथही होती. आणि यामुळे जर कुणाला संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपसरपंच भुरसे यांनी आरोग्य विभागाला केला आहे. फेकलेले इंजेक्शन्स शासनाचे नसतील तर कोणत्या खासगी डॉक्टरचे आहेत का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनापूरवासीयांनी केली आहे.

मिळून आलेल्या इंजेक्शन्सची चौकशी केली असता ते सन २०१८ चे असल्याचे निष्पन्न झाले. गावात २६ मे रोजी करण्यात आलेल्या लसीकरणादरम्यान वापरण्यात आलेले इंजेक्शन्स नष्ट करण्यात आले आहे.- डॉ. मनोहर मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, सावली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchandrapur-acचंद्रपूर