शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

महापौर चषक स्पर्धेत ‘पिकलबॉल’ची सर्विस

By admin | Updated: November 21, 2015 01:21 IST

गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह संपूर्ण देशात लोकप्रिय होत असलेला पिकलबॉल खेळ सरकारच्या साहाय्याने आपले स्थान आणखी भक्कम करण्यास सज्ज झाला आहे.

रणधुमाळी : पक्ष लागले उमेदवारांच्या शोधातकोरपना : निवडणूक म्हटली की पुढारी नेहमी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहून तसे धावपळ करताना दिसतात. नेमका तोच प्रत्यय घोषित झालेल्या कोरपना नगरपंचायतीच्या पहिल्या नगरपंचातीच्या निवडणुकीच्या निमित्ताने येऊ लागला आहे. वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने पुढाऱ्यात लगीनघाई दिसून येत असून नगरसेवक पदाची स्वप्ने बाळगणाऱ्यांची राजकीय सेटींग सुरू झाली आहे.लोकसंख्येने फुललेल्या कोरपना शहराचा विकास अक्षेपेप्रमाणे अद्यापही झाला नाही. रस्ते, पाणी, वीज, आरोग्यासारख्या मूलभूत गरजांसाठी कोरपनावासीयांना संघर्ष सुरू आहे. मात्र लोकसंख्या वाढीचा एका अर्थाने फायदाच झाला. ग्रामपंचायती ऐवजी आता नगरपंचायत झाल्याने विकासाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले व तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यात निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली. कुठल्याही स्थितीत नगरसेवक व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या काही पदाधिकाऱ्याचे स्वप्न आरक्षणामुळे अडचणीत सापडले आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय गोटात आता ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती आहे. आता लवकरच नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम लागणार असताना राजकीय पुढाऱ्यांनी निवडणुकाची तयारी सुरू केली आहे. कोरपना येथील सर्वच प्रमुख पक्षांनी उत्तम संभाषण कौशल्य, तगडा जनसंपर्क, गर्दी खेचण्याची क्षमता असे निकर्ष लावूनच उमेदवारांची निवड करण्यावर नेतृत्वांचा भर आहे. (शहर प्रतिनिधी)समस्या दुर्लक्षितनिवडणुकीसाठी उत्साहीत झालेल्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना जनतेच्या व्यथांशी काही देणे घेणे नसावे, अशी स्थिती प्रत्यक्षात दिसून येत आहे. शहरातील नागरिक मूलभूत सुविधांअभावी त्रस्त झाले असून शासकीय कार्यालयात कुठलेही काम तत्परतेने होत नाही. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध चिड आहे. तहसील कार्यालयात सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी प्रचंड हेलपाटे खावे लागतात. शहरात पाणी प्रश्नही दिवसागणिक गंभीर होत असून बंद पडलेले पथदिवे, अस्वच्छतेने वेढलेल्या रस्ते याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.