शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अनुज्ञेय खर्चमर्यादा ठरतेयं मारक

By admin | Updated: December 18, 2014 00:49 IST

शासनाच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या परिरक्षण व दुरुस्तीच्या मापदंडानुसार मागील तीन वर्षातील सरासरी सिंचनावरुन व मागील ...

चंद्रपूर : शासनाच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या परिरक्षण व दुरुस्तीच्या मापदंडानुसार मागील तीन वर्षातील सरासरी सिंचनावरुन व मागील तीन वर्षातील पाणीपट्टीच्या सरासरी वसुलीवरुन अनुज्ञेय खर्च काढला जातो व दोन पैकी जी कमीतकमी रक्कम आहे, तीच रक्कम अनुज्ञेय खर्च म्हणून घेण्यात येतो. मात्र, ही खर्च मर्यादा मारक ठरत असल्याने पाणी वाटपात अडचणी येत आहेत. त्यामुळे परिरक्षण व दुरुस्तीच्या मापदंडात सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने पाणीपट्टीचे दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ५० टक्के सवलतीमुळे निम्मे आहेत. तसेच मामा तलावाखालील क्षेत्र निस्तार हक्काचे असल्याने त्यावर आकारणी होत नाही. खरीप हंगामातील सर्व क्षेत्र करारनामा क्षेत्र असल्याने त्यावरील पाणीपट्टीचे दरही निम्मे आहेत. या सर्व कारणांमुळे सिंचन प्रकल्पावरील पाणीपट्टी वसुली निम्म्यानेच होत असते. त्यामुळे सरासरी पाणीपट्टी वसुलीच्या प्रमाणात अनुज्ञेय खर्चाची मर्यादा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अन्यायकारक ठरत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे परिरक्षण व दुरुस्तीसाठी किमान १२०० रुपये प्रति हेक्टर मापदंड होणे आवश्यक आहे. याची शासनाने दखल घ्यावी. (स्थानिक प्रतिनिधी)