शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

कोरोनाच्या शोधात आढळले विविध आजारांचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ओळखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्करोगाचे ३१५ रुग्ण : जिल्ह्यात ९ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेवकांच्या मार्फत कंटेनमेंट झोन व रुग्ण सापडलेल्या परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान कर्करोग, मधुमेह, ताप, फुफ्फुसाचे आजार, ह्दयरोग अशा विविध आजारांचे रुग्ण आढळले.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ओळखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत एक सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ लाख ४१ हजार २३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील ४२००, भद्रावती ६६४५६, ब्रह्मपुरी-६५८९, चंद्रपूर- २६४८५३, चिमूर-६०९६७, गोंडपिपरी-३७७११, जिवती-४०४२८, कोरपना-१०४१८८, मूल-५७५०१, नागभीड-७४७६४, पोंभूर्णा-३०२१०, राजुरा-६९६५०, सावली- ३२१०७, सिंदेवाही-४९३८० तर वरोरा तालुक्यातील ३२२२६ जणांची तपासणा करण्यात आली. तपासणीत जिल्हाभरात कर्करोगाचे ३१५ रुग्ण आढळून आले आहे. या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक ५३ कर्करुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आढळले. त्यापाठोपाठ नागभीड (५०) व कोरपना तालुक्यात (४८) कर्करुग्ण आढळून आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दली.कोरोना रूग्णात २१ ते ३० वयोगटातील अधिकजिल्ह्यात २९ जूनच्या सकाळच्या अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ८७ रुग्णांमध्ये सर्वाधिक ३८ रुग्ण हे २१ ते ३० या वयोगटातील आहेत. ० ते २० वयोगटात दहा, ३१ ते ४० वयोगटात १८, ४१ ते ६० वयोगटात १६ व ६० वर्षांवरील पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकूण रुग्णात पुरुष ५४ तर ३३ महिला पॉझिटिव्ह आढळल्या.मधुमेहाचे ९१९३ रुग्णकोविड-१९ अंतर्गत आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्हाभरात आतापर्यंत नऊ हजार १९३ मधुमेहाचे रुग्ण आढळून आले. बल्लारपूर तालुक्यात ६३, भद्रावती-६८९, ब्रह्मपुरी-५८६, चंद्रपूर- ३०३९, चिमूर-६१७, गोंडपिपरी-२१७, जिवती-२०९, कोरपना-१३२६, मूल-३३६, नागभीड-४६५, पोंभूर्णा-१०६, राजुरा-२५७, सावली- २९०, सिंदेवाही-६७२ तर वरोरा तालुक्यात ३२३ मधुमेहाचे रुग्ण आढळले.इतर आजारांचे रुग्णया सर्वेक्षणात जिल्हाभरात तापाचे १११८, सर्दीचे १४७५, श्वसनाचा त्रास ७४३, उच्च रक्तदाब २३१३५, फुफ्फुसाचा आजार १७८७, टीबी ४८३, ह्दयरोग १२१५ असे रुग्ण आढळून आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या