शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सरकारकडून धान उत्पादकांना आशा

By admin | Updated: November 2, 2014 22:32 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील १५ वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष

चंद्रपूर : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील १५ वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. ही बाब केंद्रातील व राज्यात सत्तारुढ होणाऱ्या भाजपाने प्रचारादरम्यान उचलून धरली होती. त्याला धान उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. केंद्र व राज्यात आता शेतकऱ्यांच्या हिताचे शासन आल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता दिवस चांगले येणार अशी प्रतीक्षा लागली आहे. खरीप हंगामातील धानपिक हातात आले असताना पूर्व विदर्भातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र व हमी भावाचा तिढा न सुटल्यामुळे नव्या शासनाकडे बळीराजाचे लक्ष लागलेले आहे. पूर्व विदर्भातील हे चार जिल्हे राज्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने तत्कालीन केंद्रासह राज्य शासनाचेही या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले आहे.या जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धान उत्पादक शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी मागील दोन दशकापासून आंदोलने, मोर्चे काढण्यात येत होते. केंद्र व राज्य शासन प्रत्येक खरीप हंगामात ५० ते १०० रुपये समर्थन मूल्य वाढवून शेतकऱ्याची बोळवण घालत होते. शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाल्यास बोनसचे बोळवण देऊन बळीराजाचा आवाज दडपण्यात येत होता. त्यातच शेतकऱ्याने पिकविलेल्या धानपिकावर व्यापारी मालामाल होत आले.एवढे कष्ट सोसूनही केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांची उपेक्षाच केली. त्यानंतर आता पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना उचलून धरले.या शेतकऱ्यांनीही भाजपाच्या कार्यकाळात आपल्याला न्याय मिळेल या आशेने त्यांना सत्तास्थानी बसण्याइतपत कौल दिला. त्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार, याची प्रतीक्षा लागली आहे. सध्या खरिपाचे पीक हाती यायला सुरुवात झाली आहे. आज घडीला पूर्व विदर्भातील या चारही जिल्ह्यात शासकीय आधारभूत केंद्र व शासकीय हमी भावाचा अंदाज नसला तरी येत्या पंधरवाड्यात केंद्र व राज्य शासनाकडून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्याच शासनाप्रमाणे आता भाजपा शासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली तर येणाऱ्या काळात हेच शेतकरी आश्वासने देणाऱ्या सत्ता पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असेही शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)