नागरिकत्व विरोधात गडचांदुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:21+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौकमार्गे सावित्रीबाई फुले शाळा चौकातून बसस्थानक मार्गे काढून गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

Opposition to Citizenship Against Citizenship | नागरिकत्व विरोधात गडचांदुरात मोर्चा

नागरिकत्व विरोधात गडचांदुरात मोर्चा

ठळक मुद्देमुस्लीम बांधवांची उपस्थिती : सभेमध्ये सीएबी, एनआरसीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा विरोध दर्शविण्यासाठी गडचांदुरातील तिन्ही मशिदीमधील मौलांनाच्या नेतृत्वात मुस्लीम बांधवातर्फे मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौकमार्गे सावित्रीबाई फुले शाळा चौकातून बसस्थानक मार्गे काढून गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी सय्यद अबिद अली, मंचावरील तिन्ही मस्जिदचे मौलाना, प्रा. हेमचंद्र दुधगवळी, अरुण निमजे, धनंजय छाजेड, सागर ठाकूरवार, पडवेकर आदी उपस्थित होते. यावेळी एनआरसी, सीएबी, विरोध करत या बिलाचा निषेध करुन भारत सरकार देशाला पुन्हा एकदा फाळणीकडे नेत असून हिंदु मुस्लिम यांच्यात भेदभाव निर्माण करत असल्याचे वक्तव्य प्रमुख पाहुण्यांनी केले.
प्रास्ताविक नासिर खान, संचालन व आभार रफिक शेख यांनी केले. रौफ खान, कय्युम खान, हाजी अब्दुल रझाक, मिठाणी, मौलाना मह्ममद , अकबर, अहमद भाई यांच्यासह शहरातील सर्व मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
 

Web Title: Opposition to Citizenship Against Citizenship