शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मंडई उरली आता फक्त बाजार आणि नाटकांसाठी

By admin | Updated: November 16, 2015 00:59 IST

काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागात दिवाळीच्या मुहूर्तापासून सुरू होणाऱ्या मंडई उत्सवात आता म्हणावा तेव्हढा दम राहिला नाही.

घनश्याम नवघडे नागभीडकाळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागात दिवाळीच्या मुहूर्तापासून सुरू होणाऱ्या मंडई उत्सवात आता म्हणावा तेव्हढा दम राहिला नाही. या मंडई उत्सवाची जागा आता केवळ बाजार आणि नाटकांनी घेतली, असे वर्णन कोणी केले तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही.पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानाचा हंगाम साधारणत: जून-जुलै पासून सुरू होतो आणि आॅक्टो.-नोव्हेंबरला संपतो. यावेळेस शेतकरी वर्ग मोकळाच असतो आणि धानाच्या रूपाने लोकांच्या हातात पैसा येण्यास सुरुवात झालेली असते. या मोकळ्या वेळेचा उपयोग वेळ घालविण्यासाठी मंडईच्या रूपाने व्हावा. त्याचबरोबर परंपरेने चालत आलेल्या लोककलांचे जतन व्हावे म्हणूनच मंडईची प्रथा पडली असावी.नागभीड तालुक्यात कोर्धा, चिकमारा, नवेगाव पांडव, नागभीड येथे दिवाळीच्या मुहूर्तावर या मंडईचे आयोजन होते. तालुक्यातील आणखी अनेक गावांत त्या त्या गावांच्या सोयीने मंडई भरविण्यात येते. मंडईचा हा सिलसिला डिसेंबर महिण्यापर्यंत सुरु असतो. पण दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या मंडईची स्थिती लक्षात घेतली आणि दंडार मंडळाचा प्रतिसाद लक्षात घेतला तर मंडईची कीव आल्यावाचून राहत नाही.दोन-तीन दशकापूर्वी मंडई म्हटले की एक वेगळाच उत्साह असायचा मंडई मध्ये आपल्या गावच्या दंडार मंडळास सहभागी व्हायचे आहे, म्हणून १५ दिवस अगोदर पासूनच पूर्वतयारी करण्यात येत होती. मंडईच्या आदल्यादिवशी त्याची रंगीत तालीम म्हणून ‘भडकी दंडार’ सादर व्हायची. तत्पूर्वी ज्या गावात मंडईचे आयोजन होते. त्या गावची आयोजक मंडळी गावोगावच्या दंडार मंडळांना खास निमंत्रण पाठवायचे आणि मंडई उत्सवात किमान १० ते १५ दंडार मंडळे सहभागी व्हायचे आणि लोककलेचे दर्शन घडवायचे.पण हे दिवस आता संपल्यात जमा आहेत. दंडार मंडळे आता दिसेनाशी झाली आहेत. अपवादाने एखादा मंडळ या मंडईत हजेरी लावत असतो. आता या मंडईची जागा केवळ बाजार आणि रात्रीच्या नाटकांनी घेतली आहे. ज्या गावात मंडईचे आयोजन असते त्या गावात हमखास नाटकांचे आयोजन असते.