शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने प्रथमच ऑनलाईन उपवर-वधू परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

राजू गेडाम मूल : कोरोनाच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम ठप्प पडले. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शेकडो लग्नसभारंभावर बंदी घातली होती. त्यामुळे ...

राजू गेडाम

मूल : कोरोनाच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम ठप्प पडले. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शेकडो लग्नसभारंभावर बंदी घातली होती. त्यामुळे अनेक उपवर-वधूच्या पालकांना चिंता सतावत होती. यात आदिवासी समाजात मोडणाऱ्या सर्व जमातीच्या लोकांसाठी ऑनलाईन उपवर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्याची संकल्पना लक्ष्मण सोयाम या शिक्षकाने साकारली. मूळ वंशज आदिवासी ब्युरोची निर्मिती करून ऑनलाईन वधूचा परिचय देण्याची संधी उपलब्ध करून दिली.

जो समाज मागासलेला आहे, त्याच समाजाने पुढाकार घेऊन कोरोनाच्या काळात वर-वधू पालकांना आपल्या पाल्याच्या परिचयाची संधी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

शहीद बाबूराव शेडमाके बहुउद्देशीय संस्था जानाळाच्या वतीने मूळ वंशज आदिवासी मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून दरवर्षी वर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते. मात्र कोरोनाच्या धास्तीने ते होऊ शकले नाही. तब्बल १० महिन्यानंतर सर्व पूर्वपदावर येत असल्याने लग्नसमारंभ सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कोरोनाची भीती आजही कायम आहे. त्यामुळे वधूचा परिचय गर्दीत न होता, आहे त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून व्हावा, यासाठी पेशाने शिक्षक असलेले संचालक मूळ वंशज मॅरेज ब्युरोच्या वतीने आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन मूल येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घा‌टन शहीद बाबूराव शेडमाके बहुउद्देशीय संस्था जानाळाच्या अध्यक्ष राधाबाई सोयाम यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष अशोक येरमे यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन परिचय मेळाव्यात वर-वधूचा परिचय पार पडला. या कार्यक्रमासाठी अशोक अलाम, प्रमोद मडावी, अरविंद मेश्राम, बालस्वामी कुमरे, संतोष सिडाम, गुरुदेव कुळमेथे अभिषेक पेंदा, राहुल पेंदाम, धीरज कनाके, प्रमोद देशमुख, वैशाली सोयाम आदीनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

बॉक्स

१२२ युवक-युवतींनी दिला परिचय

यावेळी १२२ युवक-युवतींनी आपापला परिचय करून दिला. यात महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड येथील आदिवासीबांधव जुळले होते. यापूर्वी १३ वर्ष स्टेजवर परिचय मेळावा आयोजित केला गेला होता. मात्र यावर्षी कोरोनामुळे १४ वे वर्ष ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडले. समाजाची वेबसाईट तयार करण्याचा मानस ब्युरोचे संचालक लक्ष्मण सोयाम यांनी व्यक्त केला आहे.