वरोरा नाका उड्डाण पुलाचा एक भाग रहदारीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:44 IST2016-04-02T00:44:36+5:302016-04-02T00:44:36+5:30

चंद्रपूर शहरातील वरोरा नाका उड्डाण पुलाचा एक भाग शुक्रवारी रहदारीसाठी खुला करण्यात आला.

One part of the Warra Naka flight bridge is open for traffic | वरोरा नाका उड्डाण पुलाचा एक भाग रहदारीसाठी खुला

वरोरा नाका उड्डाण पुलाचा एक भाग रहदारीसाठी खुला

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वरोरा नाका उड्डाण पुलाचा एक भाग शुक्रवारी रहदारीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे नागपूर मार्गावर वाहतूकदारांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.
शुक्रवारी सकाळी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून या पुलाचा एक भाग रहदारीसाठी खुला करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, जि.प. सभापती देवराव भोंगळे, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, उपविभागीय अभियंता उदय भोयर, नगरसेवक अंजली घोटेकर, राहुल पावडे, तुषार सोम व सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी हजर होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणारी उड्डाण पुलाची दुसरी विंग पूर्ण झाल्यावर या पुलाचे औपचारिक उद्घाटन केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी स्पष्ठ केले.
उड्डाण पुलाचा एक भाग रहदारीसाठी खुला करण्यात आल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवून पुलावरून मार्गक्रमण केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: One part of the Warra Naka flight bridge is open for traffic