शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । गडचांदूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचांदूर शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून ९ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील व गडचांदूर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयासाठी कामाला लागावे, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही लढवत असून गडचांदूरच्या विकासासाठीच मते मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीत गडचांदूर नगर परिषद निवडणूकीतील भाजपाच्या विजयाच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्यात आले. जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारे प्रामाणिक प्रतिमेचे उमेदवार ही भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू असणार आहे. गेल्या पाच वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला. या पुढील काळातही गडचांदूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा वचनबध्द असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.गडचांदूर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेलच या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केले. बैठकीला भाजपा नेते शिवाजी सेलोकर, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, उपाध्यक्ष आनंदीताई मोरे, सतीश उपलंचीवार, निलेश ताजणे, संदीप शेळके, रोहन काकडे, गोपाल मालपाणी, रामसेवक मोरे, हरीश भोरे, मधुकर कोवळे, हरी मोरे, अरविंद डोहे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.शिवसेना नगरसेविकाचा भाजप प्रवेशया बैठकीदरम्यान गडचांदूर नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका चंद्रभागा कोरवते आणि शिवसेनेच्या सुनंदा पुनवटकर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन भाजपात प्रवेश घेतला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMuncipal Corporationनगर पालिका