शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातून ‘तो’ फलकच गायब

By admin | Updated: May 18, 2015 01:28 IST

राज्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर माहितीचा अधिकार कायदा २००५ पासून लागू करण्यात आला.

नवरगाव : राज्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर माहितीचा अधिकार कायदा २००५ पासून लागू करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकाराचे फलक दर्शनी भागावर लावण्यात आले आहेत. परंतु नवरगाव येथील कृषी विभागाच्या कृषी मंडल कार्यालय याबाबत अपवाद ठरले असून या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलकच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीवर्ग माहिती अधिकारापासून वंचित आहेत. तसेच संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.भ्रष्टाचाराला आळा बसावा व सामान्य जनतेला माहिती मिळावी, या हेतूने शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी माहिती अधिकाराविषयी फलक दिसून येतात. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आलेल्या नवरगाव येथील कृषी मंडल कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक नसल्याने अजूनही काही विभागात जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकार कायद्याला १० वर्षाचा कालावधी होत असताना या कृषी विभागाच्या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक न दिसणे ही मोठी खेदाची बाब आहे.एखाद्या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक नसणे ही बाब माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन नाही का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. माहिती अधिकार कायद्यातंर्गत कामकाजात सुसूत्रता येईल. सोबतच काही अंशी भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल, असे अपेक्षित होते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने व हलगर्जीपणामुळे या कायद्याचे तीनतेरा वाजले. माहिती अधिकार कायद्यातंर्गत कोणत्या विभागात कशी माहिती मागावी, हे सर्वसामान्य जनतेला माहीत नसल्याने काही विशिष्ट लोक माहिती अधिकाराचा वापर करून आपली पोळी भाजून घेण्याचे काम करीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचीही चर्चा जनतेत आहे. कृषी विभागाच्या मंडल कार्यालयासी शेतकरी वर्गाचा नेहमीच संबंध येतो. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना पुरविणे हे त्यांचे काम आहे. याही कामकाजात कुठेतरी हलगर्जीपणा होत असल्याचे चव्हाट्यावर आणले. त्यातल्याच एका प्रकारात माहिती अधिकारचा फलक दर्शनी भागात लावणे अत्यावश्यक असतानाही दिसून येत नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे जनतेला माहिती अधिकाराचा लाभ घेता यावा, यासाठी फलक लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)