शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदात्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना

जनजागृतीची गरज : साडेपाच वर्षांत केवळ १०५ जणांनी केले नेत्रदानचंद्रपूर: अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना डोळस करण्याच्या आड येत आहे. आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्याने नागरिक नेत्रदान करण्यासाठी घाबरत आहे. एवढेच नाही तर, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याने मागील काही वर्षांमध्ये नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. समाज शिक्षित होत असला तरी, नेत्रदानासाठी आजही अंधश्रद्धा असल्याचे एका सर्व्हेक्षणात समोर आले आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान करण्यासाठी एका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये समुपदेशनाचे काम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र आजही नेत्रदानाविषयी नागरिकांत भीती आहे. विशेष म्हणजे, एकाद्या कुटुंबातील सदस्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबीयाना मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी समुपदेशन केंद्राद्वारे प्रयत्न केले जाते. मात्र अनेकवेळा यासाठी कुटुंबीय तयारच होत नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने नेत्रदानाची संकल्पना समोर आणली तेव्हा एक सामाजिक कार्य म्हणून याकडे बघितले. मात्र या सामाजिक कार्याला नागरिकांनी अक्षरश: पाठ दाखविली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र संकलन केंद्राला २००९-१० आणि २०१०-११ मध्ये प्रत्येक वर्षी ४० जणांचे नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते. यात २००९-१० मध्ये केवळ २८ जणांनी नेत्रदान करून अंधाना जग बघण्याची संधी दिली. २०१०-११ मध्ये यात एकाची घट होऊन २७ जणांनी नेत्रदान केले. २०११-१२ मध्ये २६ जणांनी तर २०१२-१३ मध्ये ७१ नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ट असतानाही केवळ २४ जणांनी नेत्रदान केले. २०१३-१४ मध्ये १६ जणांनी नेत्रदान केले आहे. तर चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यामध्ये केवळ ४ जणांनी नेत्रदान केले आहे. नेत्रदान करणाऱ्यांची घटती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. एवढेच नाही तर, अनेकांना अंधश्रद्धेने ग्रासले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी जग बघावे असे प्रत्येकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र नेत्रदान करण्यासाठी आजही पाहिजे तसे नागरिक समोर येत नसल्याने हजारो अंधाना दृष्टीपासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)