बाधित मृतांसह अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:18+5:302021-07-07T04:35:18+5:30

जिल्ह्यात बाधित आढळलेल्या ११ रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर २, गोंडपिपरी २, राजुरा १, मूल ...

The number of active patients also declined, including the number of infected deaths | बाधित मृतांसह अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही घसरली

बाधित मृतांसह अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही घसरली

जिल्ह्यात बाधित आढळलेल्या ११ रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर २, गोंडपिपरी २, राजुरा १, मूल ३ व वरोरा तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना व जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ७५० वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार ४९ झाली आहे. सध्या १६९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ७० हजार ८७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ८३ हजार १५६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,५३२ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: The number of active patients also declined, including the number of infected deaths