शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

आता एसटीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती

By admin | Updated: March 8, 2015 00:36 IST

जगात कुठलेही असे क्षेत्र नाही ज्यात महिला नाहीत. सामान्य महिलाही काहीतरी वेगळे करू शकतात परंतु एसटी चालकासारखे वेगळे आव्हानाचे काम करून...

महिला दिन विशेषराजकुमार चुनारकर खडसंगीजगात कुठलेही असे क्षेत्र नाही ज्यात महिला नाहीत. सामान्य महिलाही काहीतरी वेगळे करू शकतात परंतु एसटी चालकासारखे वेगळे आव्हानाचे काम करून सर्वसामान्य कुटुंबातील महिलाही असामान्य कर्तुत्व गाजवू शकतात, हे येत्या काही दिवसात राज्य परिवहन महामंडळात होणाऱ्या चालक भरतीमधून महिला सिद्ध करून दाखविणार आहे.सावित्रीच्या लेकी भारतीय संविधामुळे सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहे. आजपर्यंत महिला गावचा कारभार ते राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कल्पना चावलासारख्या महिला अंतराळामध्येसुद्धा पोहचल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सहभागाविना कुठलेच क्षेत्र शिल्लक नाही. शासनाने शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील शासकीय नोकरीमध्ये महिलांचे स्थान आहे. राज्य परिवहन मंडळामध्ये मेकॅनिक, लिपिक, वाहक या पदावर महिला कार्यरत आहे. मात्र आता राज्य परिवहन महामंडळाने काढलेल्या सात हजार ६३० जागांमध्ये महिलांना ३० टक्के चालकाच्या जागा आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे २ हजार २१४ महिलासुद्धा एसटीचे चालक म्हणून प्रवाशी वाहतूक करणार आहे.सर्वसामान्य महिलांनी संसाराचा गाडा ओढण्यासाठी चारचाकी वाहनाचे चाक हाती घेतले आहे. काही महिला मोठ्या शहरात टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कमी शिकल्यामुळे चांगली नोकरी मिळत नाही. अशा महिलांना धुनी-भांडी किंवा तत्सम हलक्या दर्जाचे कामे करावी लागते. मात्र बारावी झालेल्या महिलांनी चार चाकी वाहनाचा परवाना काढून प्रवाशी वाहन चालविण्याचे आव्हानात्मक कामही करण्याचे ठरविल्याचे आज सर्वत्र चित्र बघावयास मिळत आहे.मोठ्या शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिला इतर स्पर्धा परीक्षा किंवा विविध प्रकारच्या आरक्षित जागा जाहिरातीच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज भरतात.मुंबई -पूणे सारख्या ठिकाणी महिला टॅक्सी चालवितात. त्याच धर्तीवर आता अनेक महिलांनी एसटी चालकसाठी बॅच, बिल्ला व वाहनाचा परवाना काढत आहे. चंद्रपूर शहरातही एक महिला आॅटो चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहे. चुल आणि मूल यात अडकून न राहता. पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करुन दाखविण्याची जिद्द आता महिलांमध्ये आहे. त्यामुळे एसटीच्या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक महिला प्रवासी वाहतूक करतांना भविष्यात दिसणार आहेत.