शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार जात पडताळणी दाखले

By admin | Updated: October 17, 2015 01:42 IST

शासकीय तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले शालेय ...

पेंढरी (कोके) : शासकीय तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना जात पडताळणी दाखले शालेय स्तरावर देण्याबाबतचे शासनाचे आदेश निर्गमीत झाले असून सर्व शाळांना आदेश प्राप्त झाले आहेत.महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय १७ जुलै २०१४ नुसार शासकीय तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ११ वीच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. यास्तव आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासकीय तथा अनुदानित आश्रमशाळा तसेच प्रकल्प स्तरावर समिती नेमून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना शालेय स्तरावर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यात शालेय समितीत मुख्याध्यापक, अधीक्षक, माध्यमिक शिक्षक दोन व प्राथमिक शिक्षक यांचा समावेश आहे. सदर समितीने विद्यार्थ्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून संबंधित मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र (फार्म) भरून सदर प्रस्ताव प्रकल्पस्तरीय समितीकडे पाठवायचे आहे.या समितीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (अध्यक्ष), सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सदस्य सचिव, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) सदस्य, सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) सदस्य व शिक्षण विस्तार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्पस्तरीय समिती ही संबंधित अनुसूचित जातीजमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवेल. याबाबतचा अहवाल आदिवासी आयुक्त व शासनास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांना दरमहा पाठवायचा आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलाच लाभ होणार आहे. शिवाय त्यांच्या अकरावी प्रवेशात येणाऱ्या अडचणीही दूर होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)