आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ १००५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:44 IST2020-12-12T04:44:01+5:302020-12-12T04:44:01+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार १८० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १९ हजार ...

Now the number of active patients is only 1005 | आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ १००५

आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ १००५

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार १८० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १९ हजार ८४३ झाली आहे. सध्या एक हजार पाच बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५९ हजार ६१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३५ हजार ७१४ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये चंदनवाही, ता. राजुरा येथील ६५ वर्षीय पुरूष व वरोरा येथील ८६ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. नव्याने बाधित झालेल्या ५१ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २१, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपुर एक, भद्रावती चार, ब्रम्हपुरी एक, नागभीड एक, मूल एक, गोंडपिपरी एक, राजुरा दोन, चिमुर अकरा, वरोरा पाच तसेच इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Now the number of active patients is only 1005