शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात नऊ लाखांचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

रेती तस्करी व अवैध वाहतूक : तहसील कार्यालयाची कारवाई भोजराज गोवर्धन मूल : मूल तहसील कार्यालयाचे तहसीलदार डाॅ. ...

रेती तस्करी व अवैध वाहतूक : तहसील कार्यालयाची कारवाई

भोजराज गोवर्धन

मूल : मूल तहसील कार्यालयाचे तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांनी रुजू होताच मूल तालुक्यात अवैध रेती वाहतूक, गिट्टीवर ताडपत्री न झाकणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले. केवळ तीन महिन्यात नऊ लाख रुपयांचा महसूल त्यांच्या या कारवाईतून जमा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने रेतीघाटाचे अजूनही लिलाव केलेले नाही, परंतु अवैध रेती वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे तालुका प्रशासनाने गस्त घालून अवैध रेती वाहतूकदारांवर कारवाई सत्र सुरू केले आहे. मूल तालुक्यात रेती तस्करी करताना मौजा बोरचांदली, सुशी, चिचाळा आणि राजगड येथून रेती भरलेले टॅक्टर जप्त केले आहेत. मौजा चिखली, मूल, केळझर, चिचाळा, डोणी फाटा, आगडी येथे गिट्टी भरलेल्या हायवामध्ये ताडपत्री न झाकल्याच्या करणावरून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर मुरूम वाहतूक करीत असताना ताडपत्री न टाकल्यामुळे विरई येथे एका वाहनावर तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण वाहनधारकांकडून नऊ लाख १४ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बॉक्स

तहसील कार्यालयात वाहनांची गर्दी

गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी अनेक वाहने जप्त करण्यात आली आहे, परंतु अवैध वाहतूकदारांनी अनेक वाहनाचे दंड भरलेले नाहीत. यामुळे तहसील कार्यालय परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी रांग दिसून येत आहे. केवळ तीन महिन्यात लाखो रुपयांचा महसूल जमा करणारे मूलचे तहसीलदार डाॅ. रवींद होळी यांच्यामुळे मूल तालुक्यातील रेती तस्कर धास्तावले आहेत.