शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समिती निवडीचा नवरगाव ग्रामपंचायतीला विसर

By admin | Updated: April 23, 2015 01:02 IST

येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड अजूनही झालेली नाही.

नवरगाव : येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची निवड अजूनही झालेली नाही. जुन्या समितीचीही फेरनिवड मागील दोन वर्षांपासून झालेली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला समिती निवडीचा विसर तर पडला नाही ना? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.गावातील तंटे गावातच मिटावे न्यायालयापर्यंत जाण्याची पाळी नागरिकांवर येऊ नये, यासाठी तत्कालिन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना अमलात आली. गावागावात तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आली. तंटामुक्त समित्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी बक्षिसरुपी देणगीही देण्याचे ठरविण्यात आले. कित्येक गावांनी उल्लेखनीय कार्य करून बक्षीस पटकाविले. तंटामुक्त समित्यांना राजकीय गंध लागू नये, यासाठी विविध क्षेत्रातील आणि त्या-त्या क्षेत्रात पारंगत असलेल्या लोकांचा समावेश व्हावा, जेणेकरुन न्याय निवाडा निष्पक्षपाती होईल हा त्या मागचा उद्देश होता. सुरुवातीला या निकषाचे पालनही झाले अन् आता या तंटामुक्त समितीत राजकारण शिरले आहे. दरवर्षी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी तंटामुक्त समिती सदस्यांची निवड केली जाते. प्रत्येक गावात दरवर्षी तंटामुक्त समिती अथवा अध्यक्षाची निवड करण्याची अथवा फेरनिवड करण्याची प्रथा आहे. परंतु नवरगाव हे अपवाद ठरले आहे. मागील दोन वर्षांपासून येथे तमुंस अध्यक्षाची निवड झालेली नाही.तंटामुक्त समित्यांची स्थापना झाली तेव्हापासून प्रत्येक तालुक्यातील ७० ते ८० गावांना तंटामुक्त गाव समितीचा पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार रकमेचा वापर गाव विकासासाठी झाला. परंतु नवरगाव अजूनही पुरस्कारापासून वंचित आहे. याला येथील तंटामुक्त समितीची निष्क्रियता म्हणायची की, नियोजन शुन्यता हे न समजन्याच्या पलिकडेच आहे.तंटामुक्त समितीची निवड अजूनही झाली नसताना पोलीस पाटलाची निवड का करण्यात आली नाही, असा हेही एक कोडेच आहे. समिती निवडीचा विसर पडलेल्या ग्राम पंचायत प्रशासनाने ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करावी अशी मागणी गावतील नागरिक करीत आहे. समिती अभावी गावात अनेकदा तंटे निर्माण होत असतात. (वार्ताहर)