नागभीड-सिंदेवाही राज्यमार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:21+5:30

नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दुचाकी व पदचाऱ्यांना मोठा त्रास होतो. वाहतूकीसाठी तयार केलेल्या पर्यायी मार्गावर पाणी मारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असतानाही त्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Nagbhid-Sindhewhi highway threatens health of citizens | नागभीड-सिंदेवाही राज्यमार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागभीड-सिंदेवाही राज्यमार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देअनेक ठिकाणी अर्धवट पुलाचे बांधकाम । रस्त्यावर नियमित पाणी टाकण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : नागभीड सिंदेवाही राज्यमहामार्ग क्रमांक नऊचे सार्वजनिक बांधकाम विभागांकडून करोडो रुपयांचा निधी खर्च करून बांधकाम सुरु आहे. मात्र कंत्राटदाराकडून रोडवर पाणी मारत नसल्याने वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दुचाकी व पदचाऱ्यांना मोठा त्रास होतो. वाहतूकीसाठी तयार केलेल्या पर्यायी मार्गावर पाणी मारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असतानाही त्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र याचा फटका वाहनचालकांना व नागरिकांना होत आहे. तसेच रस्त्याच्या कळेला असणाºया अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाला धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्यावर सकाळ व संध्याकाळी पाणी मारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

धुळीमुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराब
महात्मा फुले विद्यालयाजवळ असणाºया नाल्याचे बांधकाम करण्यासाठी शाळेच्या मागील बाजूकडून वळण मार्ग काढण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरुन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात जाणे-येणे असल्याने त्यांना दररोज धुळींचा सामना करावा लागतो. अनेकदा विद्यार्थ्यांचा शाळेचा पोशाखही खराब होतो. त्यामुळे पाणी मारण्याची मागणी मुख्याध्यापक कामडी यांनी केली आहे.

Web Title: Nagbhid-Sindhewhi highway threatens health of citizens